मॅक ओएस ९
| स्थापना | २३ ऑक्टोबर 1999 |
|---|---|
| मालिका | Classic Mac OS |
| मागील. | Mac OS 8 |
| पुढील | मॅक ओएस एक्स सार्वजनिक बीटा |
| नंतरचे | मॅक ओएस एक्स चीता |
| विकसक | ॲपल |
| Platform | PowerPC |
| संचेतन आवृत्ती | 9.2.2 |
| अधिकृत संकेतस्थळ | http://www.apple.com/support/macos9/, http://www.apple.com/it/macos/ |
| परवाना | proprietary license |
| Copyright status | copyrighted |
मॅक ओएस ९ ही ॲपलने मॅकिंटॉश संगणकांसाठी विकसित केलेल्या क्लासिक मॅक ओएस कार्यप्रणालीची (ऑपरेटिंग सिस्टीम) नववी आणि शेवटची मुख्य आवृत्ती होती. ही २३ ऑक्टोबर १९९९ रोजी प्रकाशित झाली.[१] यामध्ये शेरलॉक २ शोधयंत्र, ॲपलच्या आयटूल ऑनलाइन सेवांचे एकत्रीकरण आणि ओपन ट्रान्सपोर्ट नेटवर्किंगमधील सुधारणा यांसारख्या नवीन इंटरनेट वैशिष्ट्यांचा समावेश होता.
२००१ च्या उत्तरार्धात मॅक ओएस ९ चे पुढील संशोधन व विकास बंद केले. मॅक ओएस ९ च्या अंतिम आवृत्तीमध्ये प्रामुख्याने पूर्वीच्या सुविधा कार्बन संशी सुसंगतता (कंपॅटिबिलिटी) ठेवण्यावर भर देण्यात आला. २००२ च्या ॲपल वर्ल्डवाइड डेव्हलपर्स कॉन्फरन्स मध्ये स्टीव जॉब्स यांनी मॅक ओएस ९ ची एक काल्पनिक अंत्ययात्रा काढून आपल्या मुख्य भाषणाची सुरुवात केली. us ॲपलच्या मॅक ओएस एक्स कडे पूर्ण स्थलांतराचे प्रतीक मानली जाते.[२]
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ↑ "October 23, 1999: Mac OS 9 Released". AppleMatters.com. 2009-10-28 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2009-11-28 रोजी पाहिले.
- ↑ "Apple WWDC 2002-The Death Of Mac OS 9". YouTube.com. 2 April 2006. 2010-04-18 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2010-03-16 रोजी पाहिले.