मृत समुद्राचे बाड
15,000 fragments of about 850 scrolls from ancient Judaism | |
माध्यमे अपभारण करा | |
![]() | |
उच्चारणाचा श्राव्य | |
---|---|
प्रकार | archaeological artifact, हस्तलिखिते, discovered text |
ह्याचा भाग | ज्यू धर्म (classical antiquity) |
लेखक |
|
Location of discovery |
|
भाग |
|
![]() | |
![]() |

मृत समुद्राचे बाड ही इ.स. १९४६ ते इ.स. १९५६ दरम्यान मृत समुद्राच्या वायव्य तीरावर सापडलेल्या ९७२ हस्तलिखिते आहेत.[१]
मृत सागर गुंडाळ्या (Dead Sea Scrolls) बायबलच्या सर्वात प्राचीन प्रती
इसवी सन १९४७ मध्ये इस्रायेलमधील यरीहोनजिक कुम्ररान येथे मोहमद अबू धीब नावाच्या एका बदाऊन मेढपालाला मृत समुद्रानाजिक एका गुहेत काही प्राचीन गुंडाळ्या सापडल्या व साऱ्या जगातील पवित्र शास्त्राचे अभ्यासक, विद्वान यांचे लक्ष तेथे वेधले गेले. आतापर्यंत ११ गुहांमध्ये हस्तलिखिते मिळाली आहेत. ही ख्रिस्तपूर्व शेवटचे शतक ते इसवी सन पहिले शतक या काळात लिहिलेली आहेत. चवथ्या गुहेतच ३८२ लेख मिळाले. यापैकी १०० गुंडाळ्या पवित्र शास्त्रासंबंधी आहेत. त्यात पवित्र शास्त्रातील (जुना करार) एस्तेर पुस्तक वगळता हिब्रू पवित्र शास्त्रातील सर्वे पुस्तकांचे भाग अगर संपूर्ण पुस्तके आहेत. याखेरीज अप्रमाणित पुस्तके, दृष्टांत, साक्षात्कार, भाष्य, टीका, उपकार स्तुतीगीते व पंथीय लिखाण इत्यादी साहित्य सापडले आहे. या गुहानाजिक एका मोठ्या मठाचे अवशेष सापडले असून तेथे एसेनी नावाच्या मठवासीयांची वस्ती होती. या शोधामुळे पवित्र शास्त्रासंबंधी अभ्यासाच्या साधनात मोलाची भर पडली आहे.
(संदर्भ : पवित्र शास्त्र शब्दकोश : पृष्ठ क्रमांक ३७३)
मी त्यांच्यासमक्ष बारुखास बजावून सागितले की, सेनाधीश परमेश्वर, इस्रायेलचा देव म्हणतो, मोहोरबंद व उघडे अशी ही दोन्ही खरेदीखते घेऊन एका मातीच्या भांड्यात घालून ठेव म्हणजे ती बरेच दिवस टिकतील. कारण सेनाधीश परमेश्वर, इस्रायेलचा देव म्हणतो, घरे दारे, शेते, द्राक्षाचे मळे यांची या देशात पुन्हा खरेदी चालू होईल. (यिर्मया ३२: १४-१५)
वाळवंटातील खजिना (मृत सागर गुंडाळ्या)
इस्राएलमधील मृत समुद्र हे जगातील एक आश्चर्य म्हणावे लागेल. अलिकडे मात्र एका वेगळ्याच कारणासाठी हा परिसर प्रकाशझोतात आला आहे. १९४७ सालची ही घटना आहे. इस्रायेलचा स्वातंत्र्यलढा ऐन जोशात होता. त्याच काळात मृत समुद्राजवळ एक बेदुईन मुलगा आपल्या हरवलेल्या मेंढराचा शोध घेत टेकड्यातून हिंडत होता.
फिरत असताना एका गुहेत त्याला एक जुने मडके आढळले. कुतूहलाने त्याने ते मडके उघडून पहिले. चर्मपत्राचे काही जीर्ण तुकडे त्याला त्यात दिसले. त्याने ते घरी आणून आपल्या वडिलांना दाखविले. ही काहीतरी प्राचीन मौल्यवान वस्तू आहे हे त्याने जाणले. त्याने ते बेंथलेहमला नेऊन जुन्या वस्तूंच्या दुकानात विकले. दुकानदाराला चर्मपत्रांच्या सात मोठ्या गुंडाळ्या त्या गाडग्यात मिळाल्या.
हिब्रू विद्यापीठाचे प्राध्यापक इ. एल. सुकेनिक यांना याचा सुगावा लागला. त्यांनी दुकानदाराकडून तीन गुंडाळ्या खरेदी केल्या. जेरुसलेमच्या संत मार्क मठाचे प्रमुख रेवरंड अथनाशीयस योशुंआ सामुएल यांनी उरलेल्या चार गुंडाळ्या विकत घेतल्या. त्या गुंडाळ्याचे महत्त्व यांनी जाणले होते. अमेरिकेत आपल्याला चागले गिऱ्हाईक मिळेल असा ठोकताळा मनाशी बांधून तो ऐवज घेऊन ते १९४९ साली अमेरिकेला गेले. सुयोग्य गिऱ्हाईक काही त्यांना गवसेना.
शेवटचा उपाय म्हणून त्यांनी “वौंल स्ट्रीट जर्नल” मध्ये “विकणे आहे.” या सदरात जाहिरात दिली. ती नेमकी श्री यिगेन यादिन यांच्या वाचनात आली. यादीन हे प्रा. सुकेनिक यांचे चिरंजीव. ते सेवानिवृत्त झाले होते. पुरातन वस्तूंचे संशोधन हा त्यांचा आवडीचा विषय होता. न्यू यॉर्कच्या श्री. डी. एस. गोट्समन या श्रीमंत यहुदी माणसाच्या सहकार्याने यादीन यांनी २,५०,००० डॉलर्सना ती चर्मपत्रे समुएलकडून विकत घेतली. त्या दोघांनी तो अमोल ठेवा नंतर इस्राएल सरकारच्या स्वाधीन केला. जेरुसलेमला स्थापन केलेल्या “श्राइन ऑफ द बुक” या वस्तूसंग्रहालयात आज ती व इतर अनेक चर्मपत्रे पहावयास मिळतात.यशया (अ), यशया (ब), हबक्कुक भाष्य, आभारप्रदर्शक लेख, समुदायाची नियमावली, युद्ध नियमावली आणि उत्पत्ती असी जुन्या करारातील पुस्तकांची ती चर्मपत्रे होती. त्यांचा सागोपांग अभ्यास झाला असून ती प्रसिद्ध झाली आहेत. मृत सागरानाजिक (Dead Sea) हा ऐवज मिळाला म्हणून त्यांना “डेड सी स्क्रोल्स’” (DEAD SEA SCROLLS) असे म्हणतात.
१९५१ ते १९५६या काळात बेदुईन लोकांनी ५ आणि पुरातत्त्व विभागाने ६ अशा ११ गुहांचा शोध लावला. तिसऱ्या गुहेत तांब्याची गुंडाळी मिळाली. त्यात लपविलेल्या खजिन्याची एक यादी होती. मात्र अजून या खजिन्याचा कुणाला पत्ता लागला नाही. ४ क्रमांकाच्या गुहेतून एकूण १५००० तुकडे मिळाले. एकराव्या गुहेत जुन्या करारातील स्तोत्रंसाहितेची गुंडाळी, इयोबाच्या पुस्तकाचा अरेमाईक मधील भाग आणि २९ फूट लांबीचा “टेम्पल स्क्रोल” या गोष्टी सापडल्या. यीगेल यादीन यांनी १९६७ साली “टेम्पल स्क्रोल” विकत घेऊन इस्रायेलच्या वस्तूसंग्रहालयात ठेवला आहे. बाकीचे तुकडे जेरुसलेमच्या रॉकफेलर वस्तूसंग्रहालयात आहेत.
खरेपणा आणि कालनिश्चिती : प्राचीन अवशेषांना फार मोठे मूल्य असल्याने त्याचे अस्सलपण पारखणे जरुरीचे असते. पुराभिलेख शास्त्र, भाषाशास्त्र आणि कार्बन १४ या सर्व कसोट्यांवर ही सर्व चर्मपत्रे तपासण्यात आली असून ती अस्सल असल्याचे सिद्ध झाले आहे. काही हस्तलिखिते इसवी सन पूर्वे तिसऱ्या शतकात (ख्रिस्त जन्मापूर्वी ३०० वर्ष अगोदर) लिहिलेली किवा उतरून घेतलेली आहेत. काही पहिल्या शतकातील मूळ हस्तलिखिते आहेत. तर काही इसवी सन ६८ मधली आहेत.
या चर्मपत्रांमुळे बायबलच्या अस्सलपणावर शिक्कामोर्तब होण्यास मदत झाली आहे. मूळ मासोरातिक सहितेवरून आजचे बायबल भाषांतरित करण्यात आले आहे. या गुंडाळ्यातील लिखाण आणि बायबलची सहिता तंतोतेंत मिळतीजुळती आहे. मूळ हिब्रू भाषेतून इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकात ग्रीक भाषेत भाषांतरित केलेले व सेप्तुअजिन्त नावाने ओळखले जाणारे बायबल आहे. ७० यहुदी पंडितांनी ते भाषांतरीत केले म्हणून त्याला लाटिन भाषेत सेप्तुअजिन्त (सेप्ता म्हणजे सत्तर) असे म्हणतात.. काही चर्मपत्रावरील लिखाण या प्रतीशी मिळतेजुळते आहे.
कुम्ररान येथे जे मठवासी राहत होते, त्यांच्या प्रार्थना, संघाची नियमावली, जुन्या करारावरील भाष्ये, उपासनांचा मजकूर आदि गोष्टी या पूर्णपणे अस्सल असून इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकाच्या उत्तराधातील तो सर्व मजकूर आहे.
कुमरानची मठसंस्था : मृत समुद्र आणि जुदियन वाळवंट यांच्या पार्श्वेभूमीवर असलेल्या कुमरान या ठिकाणी इसवी सन पूर्वी दुसऱ्या शतकाच्या उतरार्धात कडक व्रत धारण केलेले व्रती संन्यासी राहत होते. पारंपारिक यहुदी धर्म, जेरुसलेममधील मंदिर व उपासना यापासून फारकत घेऊन एक अतिशय कर्मठ असा पंथ त्यांनी स्थापिला होता. एसीन म्हणून ते ओळखले जात. त्यांच्या संबंधीचे पुरावे तत्कालीन इतिहासकार जोजेफस फ्लावियास, फिलो ऑफ अलेक्झांद्रिया व प्लिनी द एल्डर यांच्या लिखाणात सापडतात. ते सर्व एकत्र राहत. त्यांचे एक मोठे ग्रंथालयही होते. अन्य यहुदी चंद्रकालगणना मानीत मात्र हे लोक सौर पद्धतीची व ३६४ दिवसांची कालगणना मानीत.
इसवी सन ७० साली जेरुसलेमचा रोमन लोकांनी विनाश केला. तेव्हा आपली धार्मिक हस्तलिखिते घेऊन ते मसादा या डोगरावर गेले. १९६४ साली मसादा येथे केलेल्या उत्खननात “शब्बाथ प्रार्थनेवेळी वापरायची गीते” ही गुंडाळी तेथे सापडली. कुमरानला सापडलेल्या याच नावाच्या गुंडाळीची ती एक प्रत आहे असे आढळून आले. कुमरान येथील चर्मपत्रांमुळे दोन हजार वर्षांपूर्वीचे दस्तऐवज हाती लागले आहेत. जवळजवळ २००० वर्षांपूर्वी लिहिलेल्या जुन्या करारातील बऱ्याच पुस्तकांच्या प्रती यात आहेत. या सर्व चर्मपत्रांवर सातत्याने संशोधन होत आहे.
संदर्भग्रंथ : संघर्षयात्रा ख्रिस्तभूमीची (लेखक : फादर फ्रांसिस दिब्रिटो)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
संदर्भ आणि नोंदी[संपादन]
- ^ Down, David. "Unveiling the Kings of Israel." P.160. 2011.