मुसलमानी महिने

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मुसलमानी महिन्यांची नावे प्रत्येक भाषेत वेगवेगळी आहेत. यांना हिजरी महिने म्हणतात. हे महिने 'फसली' महिन्यांपेक्षा निराळे आहेत.

मुसलमानी महिन्यांची मराठी नावे[संपादन]

  1. मोहरम
  2. सफर
  3. रबिलावर
  4. रबिलाखर
  5. जमादिलावल
  6. जमादिलाखर
  7. रज्जब
  8. साबान
  9. रमजान
  10. सव्वाल
  11. जिल्काद
  12. जिल्हेज

मुसलमानी तारीख (तिथी)[संपादन]

या तारखेच्या आधी छ हे अक्षर असते. उदा० छ ४ रबिलावल.

मुसलमानी तारखेत दोन मिळवले की हिंदू तिथी येते. उदा० छ ५ रजब १०५२ = आश्विन शुद्ध ७ (शके १५६४)

ग्रेगोरियन सूर्यमान कॅलेंडर आणि मुसलमानी चंद्रमान कॅलेंडर यांच्यामध्ये ११ दिवसांचा फरक असतो. दर ३३ किंवा ३४ मुसलमानी वर्षाने येणाऱ्या सनाचा आकडा आणि ३२ किंवा ३३ वर्षांनी येणाऱ्या ग्रेगोरियन सनाच्या आकड्यांमधील फरक फक्त एकदा जवळजवळ एकसारखा दिसतो. उदा०

मुसलमानी सन .....ग्रेगोरियन सन ....फरक
1060 1650 590
1093 1682 589
1127 1715 588
1161 1748 587
1194 1780 586
1228 1813 585
1261 1845 584
1295 1878 583
1329 1911 582
1362 1943 581
1396 1976 580
1429 2008 579
1463 2041 578
1496 2073 577
1530 2106 576
1564 2139 575

बारा फसली महिने[संपादन]

  1. आजूर (३० दिवसांचा महिना)
  2. दय (२९ दिवसांचा महिना)
  3. बहमन (३० दिवसांचा महिना)
  4. इस्पिंदाद (३० दिवसांचा महिना)
  5. फरवर्दी (३१ दिवसांचा महिना)
  6. आर्दिबेहस्त (३१ दिवसांचा महिना)
  7. खुर्दाद (३१ दिवसांचा महिना)
  8. तीर (३१ दिवसांचा महिना)
  9. अमरदाद (३१ दिवसांचा महिना)
  10. शॆहरेवार (३१ दिवसांचा महिना)
  11. मेहेर (३० दिवसांचा महिना)
  12. आबान (३० दिवसांचा महिना)