मुर्डी
Appearance
मुर्डी हे महाराष्ट्राच्या रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात असलेले समुद्र किनाऱ्यालगतचे एक गाव आहे. हे रॅंगलर र.पु. परांजपे आणि लेखक श्री.ना. पेंडसे यांचे जन्मगाव आहे.
याचे पूर्वीचे नाव मरूत्तटी होते. मरूत्तटी म्हणजे डोंगराच्या पायथ्याशी वसलेले. 'ह्या गावाला शिवाजीराजांनी भेट दिल्याचे संदर्भ जुन्या कागदपत्रात उपलब्ध आहेत.