Jump to content

मुफ्त विरुद्ध मुक्त

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मुफ्त विरुद्ध मुक्त हा वाक्प्रचार इंग्रजीतल्या "फ्री" (इंग्लिश: "free") ह्या विशेषणाच्या दोन वेगळ्या अर्थांमधला फरक स्पष्ट करण्यासाठी वापरला जातो. "फ्री"चा एक अर्थ "मुफ्त" (किंवा मोफत) असा होतो, व दुसरा अर्थ "मुक्त" (किंवा स्वतंत्र) असा होतो. उदा. : "फ्री लंच" म्हणजे "फुकट जेवण", पण "फ्री टेक्नॉलजी" म्हणजे "मुक्त तंत्रज्ञान". ज्या ठिकाणी "फ्री"च्या अर्थांमधला हा फरक महत्त्वाचा असतो, तिथे अर्थामधल्या संदिग्धपणामुळे विवाद निर्माण होऊ शकतो. असे विवाद प्रताधिकार व पेटंट कायद्यांशी संबंधित मामल्यांमध्ये बरेचदा घडतात.