मुगाची उसळ
Appearance
मुगाला मोड आणून केलेल्या उसळीला मुगाची उसळ म्हणतात. उसळ हा महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यात खाल्ला जाणारा पौष्टिक पदार्थ आहे. प्रथिनांचा स्रोत म्हणून उसळ या पदार्थाला आहारात स्थान देण्यात आले आहे. मटकीच्या उसळीप्रमाणेच हा पदार्थ बनवला जातो. या उसळीत मोड आलेले मूग, कांदा, टोमॅटो आणि खास घरगुती मसाले वापरले जातात. ही सुकी किंवा थोडी सरबरीत (रस्सा) करून चपाती, भाकरी किंवा पावासोबत खाल्ली जाते.
साहित्य
[संपादन]मोड आलेले मूग पाव किलो, कोथिंबीर पाव वाटी, धने-जिऱ्याची पूड दोन चमचे, आवडीप्रमाणे लाल तिखट, तेल दोन मोठे चमचे, फोडणीचं साहित्य, चवीपुरतं मीठ आणि चिमुटभर साखर.
पाक कृती
[संपादन]या पदार्थाच्या कृतीसाठी मुगाची उसळ येथे टिचकी द्यावी.