मुकुंद वासुदेव गोखले
मुकुंद वासुदेव गोखले (जन्म १८ ऑक्टोबर १९४५[१] - मृत्यू ११ जानेवारी २०१८) हे देवनागरी लिपी आणि मुद्राक्षरविद्या ह्या विषयांचे अभ्यासक, अध्यापक तसेच टंकरचनाकार होते. देवनागरी, गुजराती, गुरुमुखी, बाङ्ला, असमिया, ओडिया, तेलुगु, कन्नड, तमिळ, मल्याळम, सिंहली, बर्मी, थाई, तिबेटी, लिंबू, ताइ-अहोम, ताइ-खांप्ती, मणिपुरी, मोडी, मराठी, लेप्चा, इंग्लिश, गोंडी अशा विविध लिप्यांचे टंक त्यांनी तयार केले आहेत.[२]
शिक्षण आणि अध्यापन
[संपादन]मुकुंद गोखले ह्यांनी १९६५मध्ये नागपूर विद्यापीठातून कला विषयातील (कमर्शियल आर्ट, फाईन आर्ट, छायाचित्रण) पदविका घेतली. तसेच १९७०मध्ये मुंबईतून जी. डी. आर्ट (उपयोजित) संपादित केली. १९७० ते १९७३ ह्या कालावधीत कारकीर्द इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट आणि १९७३ ते १९७८ ह्या काळात सर ज. जी. उपयोजित कला महाविद्यालय ह्या संस्थांत उपयोजित कला ह्या विषयाचे अध्यापन केले. एप्रिल ते जून १९७५ ह्या कालावधीत भारतीय केंद्रशासनाच्या तंत्रशिक्षण-अध्यापकांसाठीच्या योजनेअंतर्गत त्यांना गुजराती टाइप फाउंड्री, मुंबई येथे काम करण्याची संधी मिळाली होती.
जानेवारी १९७९ ते जानेवारी २००० ह्या कालावधीत इन्स्टिट्यूट ऑफ टायपोग्राफिकल रीसर्च (आय. टी. आर.), पुणे ह्या संस्थेचे संचालक म्हणून ते कार्यरत होते.
प्रकाशित पुस्तके
[संपादन]- देवनागरी लिपी : चिह्नांची शास्त्रीय ओळख आणि आरेखन-परिभाषा (२००८)
- लिपिकार बापू वाकणकर – व्यक्ती आणि कार्य (२०१७)
संदर्भ
[संपादन]संदर्भसूची
[संपादन]- गोखले, मुकुंद वासुदेव. देवनागरी लिपी : चिह्नांची शास्त्रीय ओळख आणि आरेखन-परिभाषा.
- "प्रा. मुकुंद गोखले". ११ जानेवारी २०१८ रोजी पाहिले.
बाह्य दुवे
[संपादन]- विनायक रानडे ह्यांच्या यूट्यूब-वाहिनीवरील मुकुंद गोखले ह्यांची मुलाखत भाग - ०१
- विनायक रानडे ह्यांच्या यूट्यूब-वाहिनीवरील मुकुंद गोखले ह्यांची मुलाखत भाग - ०२
- विनायक रानडे ह्यांच्या यूट्यूब-वाहिनीवरील मुकुंद गोखले ह्यांची मुलाखत भाग - ०३
- विनायक रानडे ह्यांच्या यूट्यूब-वाहिनीवरील मुकुंद गोखले ह्यांची मुलाखत भाग - ०४
- विनायक रानडे ह्यांच्या यूट्यूब-वाहिनीवरील मुकुंद गोखले ह्यांची मुलाखत भाग - ०५
- विनायक रानडे ह्यांच्या यूट्यूब-वाहिनीवरील मुकुंद गोखले ह्यांची मुलाखत भाग - ०६
- विनायक रानडे ह्यांच्या यूट्यूब-वाहिनीवरील मुकुंद गोखले ह्यांची मुलाखत भाग - ०७
- विनायक रानडे ह्यांच्या यूट्यूब-वाहिनीवरील मुकुंद गोखले ह्यांची मुलाखत भाग - ०८
- विनायक रानडे ह्यांच्या यूट्यूब-वाहिनीवरील मुकुंद गोखले ह्यांची मुलाखत भाग - ०९
- मुकुंद गोखले ह्यांचा दै. लोकसत्तेत प्रकाशित झालेला कोयाबोली[permanent dead link] हा लेख