मितवा (ललित लेखसंग्रह)
Jump to navigation
Jump to search
मितवा हा मराठी कवी माणिक गोडघाटे ऊर्फ ग्रेस यांचा दुसरा ललित लेखसंग्रह होय. इ.स. १९८७ मध्ये त्याची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली. या संग्रहात सत्तेचाळीस ललित लेख आहेत.
अर्पणपत्रिका[संपादन]
हा संग्रह लेखकाने "अंगणात दाणे टाकण्यापूर्वीच उडून गेलेल्या चिमण्यांना" अर्पण केला आहे.
परिचय[संपादन]
स्वप्नवेचणीचे शिलालेख, दंतकथांचे संदर्भ, एका वैराणसूक्ताचे अधांतर आणि भासचक्राचे तोल अशा चार विभागांमध्ये हा संग्रह विभागलेला आहे.