मिडियाविकी:चर्चा नामविश्वे अटकाव (विशीष्ट संवाद)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मराठी विकिपीडियाच्या दहाव्या वर्धापन दिना निमीत्त हार्दीक शुभेच्छा.

सावधान: चर्चा नामविश्वातून आपणास संवाद मर्यादीत करणारा अटकाव केला जात आहे.

मराठी विकिपीडियावरील विविध चर्चा पानांवरून तुम्ही अलिकडे मराठी विकिपीडियाच्या इतर सदस्यांशी मराठी विकिपीडियाच्या संस्कृतीस अभिप्रेत नसलेल्या भाषेचा उपयोग केलेला आढळला.
कदाचित तुमचा उद्देश कठोर टिका करण्याचा होता किंवा रागाच्या भरात तुम्ही हे लेखन केल्याची शक्यताही आहे. तरीही इतर सदस्यांशी व्यक्तिगत अवहेलना/आरोप, असंसदीय भाषा अथवा चारित्र्यहननकारक भाषा वापरली जाणे यास मराठी विकिपीडियावर अजिबात स्थान नाही. तसे आपणाकडून अनवधानाने सुद्धा पुन्हा होऊ नये म्हणून आपणास येत्या काही दिवसांकरिता चर्चा नामविश्वातून चावडी पाने आणि काही विशिष्ट सदस्यांशी चर्चा संवाद साधण्यापासून मर्यादित प्रमाणात अटकाव केला जात आहे. पुढील काही काळात आपण मराठी विकिपीडियावरील आपले न जमणाऱ्या व्यक्तिींशी अथवा त्यांच्याबद्दल कोणतीही चर्चा टाळून सहकार्य करावे.
आपले मराठी भाषेवरचे प्रेम छोट्या मोठ्या वादविवादांपेक्षा मोठे आहे याची मराठी विकिपीडिया समुदायास खात्री आहे. त्यामुळे चर्चा नामविश्वातील अटकावाचा कालावधी तुम्ही समजून घ्याल असा विश्वास आणि विनंती आहे. हा अटकाव कालावधी कदाचित तुम्हाला मुख्य लेख नामविश्वाकडे अधिक लक्ष देण्यास प्रेरित करण्याची सुद्धा शक्यता आहे.
या अटकाव कालावधी नंतर आपण पुन्हा पहिल्याप्रमाणे मराठी विकिपीडियावर योगदान कराल अशी खात्री आहे.