माहितीचौकट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
An infobox from British Rail Class 43 car 43185 operated by First Great Western

माहितीचौकट हा एक साचा असून, त्याचे निहित विषयावरील माहिती जमविण्याचा व त्यास प्रदर्शित करण्याचा (जसे एखादा दस्तऐवज इत्यादी) एक प्रकारचा उपसंच असतो.तो एक बांधीव दस्तावेज असतो ज्यात विशिष्त किंमत निर्धारीत करण्याचे गुणधर्म असतात[१] विकिपीडियात तो लेखातील विषयात नमूद माहितीचा सारांश असतो.[२] तो काही ठिकाणी माहिती सारणीच्या समकक्ष राहू शकतो. मोठ्या दस्तावेजात त्यास टाकण्याने तो माहितीस सारांशीकृत करतो. माहितीचौकट ही बहुदा एका कडपट्टी(साईडबार) स्वरूपात दर्शविण्यत येते. माहितीचौकट ही एका वेगळ्या दस्तावेजात टाकून, त्यास आंतरविन्यासित करून, व त्यातील काही वा सर्व प्राचले नमूद केल्यास त्यास प्राचलीकरण म्हणता येते.

विकिपीडीया[संपादन]

माहितीचौकट चा वापर हा विकिवरील एखाद्या लेखाचे प्रदर्शन सुदरविण्यास [३] वापरता येतो. तो त्याप्रकारच्या इतर लेखावर लेखाच्या दर्शनच्या सुसंगततेच्या खात्री करण्यास पण वापरतात.[४] [२]

मूलतः माहितीचौकट व साचे हे सामान्यरितीने पानाच्या लेआऊटमध्ये वापरल्या जात होते.[२] विकिपीडिया:Manual of Style/Infoboxes या लेखात त्याच्या मार्गदर्शक सूचना आहेत. माहितीचौकट त्यात असणाऱ्या काही अथवा सर्व प्राचलांच्या विशिष्ट किंमती टाकून, एखाद्या लेखात आंतरविन्यासित करता येते.[५] म, साच्यात असणारे प्राचलाचे नाव यात एकसारखेच असावयास हवे. त्यात किंमत मात्र योग्य अशीच हवी.[५]. किंमत व मूळ प्राचल यात फरक करण्यासाठी व त्यास मर्यादित ठेवण्यासाठी त्यास बरोबर (=) चिन्हाने वेगळे करण्यात येते.[५]. त्या प्राचलाचे नाव हे विषयाशी सुसंगत हवे.[६]

{{माहितीचौकट हिंदू देवता
| नाव = 
| चित्र = 
| चित्र_रुंदी = 
| चित्र_शीर्षक = 
| आधिपत्य = 
| नाव_मराठी_देवनागरी_लेखन = 
| नाव_संस्कृत_देवनागरी_लेखन = 
| नाव_पाली_लेखन = 
| नाव_कन्नड_लेखन = 
| नाव_तमिळ_लेखन = 
| नाव_अन्य_लिपी = 
| नाव_अन्य_लिपी_लेखन = 
| निवासस्थान = 
| लोक = 
| वाहन = 
| शस्त्र = 
| वडील_नाव = 
| आई_नाव = 
| पती_नाव = 
| पत्नी_नाव = 
| अपत्ये = 
| अन्य_नावे = 
| या_देवतेचे_अन्य_अवतार = 
| या_अवताराची_मुख्य_देवता = 
| मंत्र = ॐ गं गणपतये नमः
| नामोल्लेख_धार्मिक_साहित्य = 
| मुख्य_तीर्थक्षेत्रे = 
| तळटिपा = 
}}
{{माहितीचौकट हिंदू देवता
| नाव = {{PAGENAME}}
| चित्र = Ganesha with mouse01.jpg
| चित्र_रुंदी = 250px
| चित्र_शीर्षक = दिल्ली येथील राष्ट्रीय संग्रहालयातील मूषकासहित मूर्ती
| आधिपत्य = बुद्धी, विघ्ने, शुभारंभ
| नाव_मराठी_देवनागरी_लेखन = गणपती 
| नाव_संस्कृत_देवनागरी_लेखन = 
| नाव_पाली_लेखन = 
| नाव_कन्नड_लेखन = 
| नाव_तमिळ_लेखन = 
| नाव_अन्य_लिपी = 
| नाव_अन्य_लिपी_लेखन = 
| निवासस्थान = 
| लोक = 
| वाहन = उंदीर
| शस्त्र = [[पाश]], [[अंकुश]], [[परशु]], [[दंत]]
| वडील_नाव = [[शंकर]]
| आई_नाव = [[पार्वती]]
| पती_नाव = 
| पत्नी_नाव = ऋद्धी, सिद्धी
| अपत्ये = 
| अन्य_नावे = ब्रह्मणस्पती, मयुरेश्वर, लंबोदर, वक्रतुंड, विनायक, विघ्नेश्वर, विघ्नहर, शूर्पकर्ण
गणपतीची बारा नावे
१.वक्रतुंड २. एकदंत ३.कृष्णपिंगाक्ष ४. गजवक्त्र ५.लंबोदर ६.विकट ७.विघ्नराजेंद्र ८.धूम्रवर्ण ९.भालचंद १०.विनायक ११.गणपती १२.गजानन
| या_देवतेचे_अन्य_अवतार = 
| या_अवताराची_मुख्य_देवता = 
| मंत्र = ॐ गं गणपतये नमः
| नामोल्लेख_धार्मिक_साहित्य = [[गणेश पुराण]], [[मुद्गल पुराण]]
| मुख्य_तीर्थक्षेत्रे = [[अष्टविनायक]]
| तळटिपा = 
}}
माहितीचौकट माहितीचौकट हिंदू देवता ही मराठी विकिपीडियावर, हिंदू देवता संबंधित लेखात वापरल्या जाते. येथे वर कोरा प्राचलांची किंमत टाकल्याविना असलेला साचा दिला आहे. तीच माहितीचौकट जी लेख गणपती येथे वापरली आहे.कृपया याची नोंद घ्या कि प्रचलांच्या किंमती ह्या बरोबर चिन्हाचे (=) उजवीकडे टाकल्या आहेत. यातील प्राचलांची नावे ही माहितीचौकट हिंदू देवता यात नमूद केल्याप्रमाणेच आहेत.यातील किंमती ह्या विकि-मार्क अप प्रमाणेच आहेत. यात शस्त्र=[[पाश]], वगैरे ही नावे संबंधित विकिपीडिया लेखाचा दुवा देतात.
The infobox for the Wikipedia article Crostata rendered by a web browser engine on a desktop computer

विकिपीडिया वर माहितीचौकट ही लेखात त्या साच्याचे नाव व प्राचले व सुसंगत माहिती दोन महिरपी कंसचिन्हात (डबल ब्रेसेस) टाकून आंतरविन्यासित केल्या जाते. ज्या मिडियाविकि संचेतनावर विकिपीडिया चालतो, मग त्या दस्तावेजास पार्स करतो.यावर टेम्प्लेट प्रोसेसरद्वारे प्रक्रिया केली जाते.हे एक प्रकारचे टेम्प्लेट इंजिन आहे जे वेब डॉक्युमेंट तयार करते.त्याद्वारे मग स्टाईल शीट द्वारे आवश्यक तो प्रभाव निर्माण होतो. याने लेखातील आशयाशिवाय मा,चे वेगळे आरेखन शक्य होते.[२] म्हणजेच, त्या साच्याचे आरेखन लेखातील आशयास धक्का पोचल्याशिवाय बदलता येते.असे केले तर, नविन माहितीचौकट ही जेथे जेथे वापरण्यात आली आहे व आंतरविन्यासित होते, तेथेतेथे ती बदलेल.[४].शक्यतोवर, डेस्कटॉप व्ह्यूमध्ये, वरचे उजव्या बाजूस व भ्रमणध्वनी मध्ये वरचे बाजूस दिसावेत अशी त्याची बांधणी व रचना केली असते.[३]

लेखातील विकि-मार्क अप मध्ये माहितीचौकट ठेवणे हे पोहोचेसाठी महत्त्वाचे आहे[७] यात सर्वात चांगली प्रथा अशी आहे कि त्यांना निःसंदिग्धीकरण साच्याखाली व सुचालन साच्याखाली ठेवण्यात यावे, पण इतर कोणत्याही आशयाचे वरचे बाजूस.[८] [९]

Baeza-Yates and King यांचे म्हणणे असे आहे कि काही संपादकांना साचे जसे माहितीचौकट क्लिष्ट वाटतात.[१०]कारण या माहितीचौकट एखादा गुणधर्म अथावा स्रोत लपवितात, ज्यास तो संपादक बदलू ईच्छितो.हे साच्यांच्या साखळीने विकोपास जाते, म्हणजे, एखादा साचा दुसऱ्या साच्यातच आंतरविन्यासित असेल तर.[१०]

एखाद्या माहितीचौकटीचे नाव माहितीचौकट ..... याप्रकारे राहू शकते. तरीही, त्यामध्ये काही छोटी नावेही असू शकतात, जसे जीवचौकट इत्यादी[८]


नोंदी[संपादन]

 1. ^ Baeza-Yates & King २००९, पान. ३१.
 2. a b c d Liyang २०११, पान. ३८५.
 3. a b Broughton २००८, पान. ३५७.
 4. a b Broughton २००८, पान. १७.
 5. a b c Broughton २००८, पान. १८.
 6. ^ Baeza-Yates & King २००९, पान. ३०.
 7. ^ Broughton २००८, पान. २३४.
 8. a b Broughton २००८, पान. २३५.
 9. ^ इंग्रजी विकिपीडियाबाबतची नीती ही तेथे Wikipedia:Manual of Style/LayoutWikipedia:Manual of Style/Lead sectionदिलेली आहे.
 10. a b Baeza-Yates & King २००९, पान. ३४५.


संदर्भ[संपादन]

पुढील वाचन[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

साचा:Wikipedia