मावा (कीड)
मावा हा पिकांवर आढळणारा एक कीटक आहे.हा साधारणतः कापूस, करडई या पिकावर जास्त आढळतो. या कीटकामुळे कापसास चिकटा हा रोग होतो.इतर पिकांवरही याचा प्रादुर्भाव होतो.[१]
वर्णन
[संपादन]हा किडा सुमारे १ ते २ मिमी आकाराचा असून त्याचे शरीर मऊ असते.त्याचा रंग साधारणतः हिरवट,तपकिरी किंवा काळसर हिरवा असतो.हा कीटक चिकट व गोडसर पदार्थ आपल्या शरीरातून बाहेर टाकतो.हा द्रवपदार्थ खाण्यास मुंग्या त्या बाधित रोपावर जमा होतात.त्यांचे पाठीवर बसून माव्याची पिल्ले दुसऱ्या रोपट्यावर स्थलांतर करतात व त्यास बाधित करतात.[१]
प्रजनन
[संपादन]मावा मादीचे प्रजनन संयोगाविना होते.मादी सरासरीने १५ पिलांना जन्म देते.याची वाढ साधारणतः १ आठवड्यात पूर्ण होते.याच्या जगण्याची दर मर्यादा २ ते ३ हप्ते आहे.[१]
पिकांचे कोणत्या प्रकारचे नुकसान
[संपादन]हा कोवळ्या वनस्पतींवर जगणारा कीटक असल्यामुळे,वाढलेल्या झाडांपेक्षा कोवळ्या झाडांचे तो नुकसान अधिक करतो.हा पानाचे खालच्या बाजूस राहून त्याचा रसाचे शोषण करतो.त्यामुळे पिकांची पाने दुमडतात.वनस्पती करपतात.त्यांची वाढ नीट होत नाही.
कीटनियंत्रण
[संपादन]नैसर्गिक शत्रुंद्वारे कीटनियंत्रण
[संपादन]- ladybug,
- राख.
इतर उपाय
[संपादन]दशपर्णीचा नियमित वापर.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |