ऑस्ट्रियाची मारिया तेरेसा
Appearance
(मारिया तेरेसा, ऑस्ट्रिया या पानावरून पुनर्निर्देशित)
हा लेख १७७२मध्ये जन्मलेली ऑस्ट्रियाची सम्राज्ञी मारिया तेरेसा याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, मारिया तेरेसा, ऑस्ट्रिया (निःसंदिग्धीकरण).
मारिया तेरेसा (६ जून, इ.स. १७७२:नेपल्स, इटली - १३ एप्रिल, इ.स. १८०७:व्हियेना, ऑस्ट्रिया) ही ऑस्ट्रियाची पहिली सम्राज्ञी आणि शेवटची पवित्र रोमन सम्राज्ञी होती. तिला हे पद फ्रांसिस दुसऱ्याशी लग्न झाल्यामुळे मिळाले. ही राजकारणात सक्रिय होती आणि अनेकदा आपल्या पतीला राजकारणाबद्दल सल्ले द्यायची.
मारिया नेपल्सचा राजा फर्डिनांड चौथ्याच्या १७पैकी सगळ्यात मोठे अपत्य होती. ती मेरी आंत्वानेत आणि स्पेनच्या चौथ्या चार्ल्सची भाची/पुतणी होती.