Jump to content

मायक्रोकंट्रोलर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इंटेलकडुन इंटिग्रेटेड सर्किट Intel 8742, हा आहे ८-बिट मायक्रोकंट्रोलर ज्यामध्ये आहे एक सिपीयु CPU जो 12 MHz वर चालतो, 128 बाइट रॅम RAM, 2048 बाईट ईपी रोम EPROM, आणि आदान/प्रदान चिप I/O .

सुक्ष्मनियंत्रक (मायक्रोकंट्रोलर) (संक्षिप्त MCU किंवा µC ) एक संगणक प्रारूप आहे जे एका चीप वर असते.यामधे संयुक्तिक गणक (integrated processor),स्मृती (थोडीशी RAM, आज्ञावली स्मृती (program memory) किंवा दोन्ही),आज्ञावाचक आदान/प्रदान साधनं सामाविष्ट असतात.ज्यांचा उपयोग चीपशी जोडलेल्या साधनां सोबत संवाद करण्याकरता केला जातो.मायक्रोकंट्रोलर हा मायक्रोप्रोसेसरहून भिन्न असतो, त्यामध्ये केवळ गणक (CPU) असतो(संगणकाच्या गणका प्रमाणे).आधुनिक संगणकयुगात मायक्रोकंट्रोलर केवळ एका चिपवर काम करू शकतो. एका मायक्रोकंट्रोलरमध्ये एक किंवा अनेक सीपीयू असू शकतात.

सुरुवातीला १९७१ मध्ये इंटेल Intel कंपनी द्वारा प्रकाशित झाल्यावर काही वर्षांत मायक्रोकंट्रोलर लोकप्रिय झाले.अत्यंत उपयुक्त इंटेल 8008 त्यावेळी प्रकाशित के‌ला गेला, परंतु तो अजूनही चिपसाठी प्रत्येकी लागणाऱ्या उच्च रकमेमुळे अव्यवहार्य होता.त्यामुळे सुरुवातीच्या मायक्रोकंट्रोलर मध्ये भिन्न प्रकारच्या संगणक स्मृती (computer memory) एकाच दलात (मायक्रोकंट्रोलर मध्ये) जुळलेल्या असतं. त्याची उपयोगीता बघितल्यानंतर, लोकांच्या त्याला आणखी चांगले बनविण्याच्या प्रयासाने, मायक्रोकंट्रोलर सतत उन्नत होत होता. कालांतराने किमती कमी झाल्या आणि २००० च्या आरंभी, मायक्रोकंट्रोलर मोठ्याप्रमाणात संपूर्ण जगात वापरले जाउ लागले.

मायक्रोकंट्रोलरसाठी इतर संज्ञा इंम्बेडेड सिस्टीम (embedded system ) आणि इंम्बेडेड कंट्रोलर (embedded controller) या आहेत.कारण मायक्रोकंट्रोलर आणि त्यांचे सहकारी सर्किट अनेकदा एकाच चिप मध्ये बनवले (किंवा एंम्बेड embed) केले जाते.

नेहमीच्या अंकगणित व तार्किक या मायक्रोप्रोसेसरच्या घटकां पेक्षा अधिक घटक जसे विदा (data) साठवण्यासाठी रॅम (RAM), आज्ञावली साठवण्याकरीता केवळ-वाचन स्मृती ( read only memory), आणि इतर साधने/जोड (peripherals) हे घटक मायक्रोकंट्रोलर मध्ये असतात.

अनेकदा मायक्रोकंट्रोलर हे मायक्रोप्रोसेसर पेक्षा खुप कमी गती वर चालतात (32khz इतक्या कमी वारंवारतेने (clock speed)), पण हे ठराविक अनुप्रयोगाकरीता उपयुक्त असते. आणि हे खुप कमी ऊर्जा वापरतात (मिलीव्ह्याट किंवा मायक्रोव्ह्याट इतकीही).

स्वयंचलित उत्पादनात आणि उपकरणात मायक्रोकंट्रोलर वापरले जातात, जसे गाडीची इंजिन प्रणाली, रिमोट कंट्रोल, मशीनी, साधने, ऊर्जाशिल अवजारे, आणि खेळणी. यांनाच म्हणतात अंतःस्थापित प्रणाली (embedded system). मायक्रोकंट्रोलर सौर शक्ती (solar power), आणि ऊर्जा संकलन, गाडीतील एन्टि-लोक ब्रेकिंग प्रणालीत काम बजावताना सापडू शकेतो, तसेच यांचे वैद्यकीय क्षेत्रात सुद्धा अनेक उपयोग आहेत.