Jump to content

माधुरी तळवलकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

माधुरी तळवलकर या एक मराठी लेखिका आहेत. अनेक वर्षी त्यांनी सातत्याने विविध प्रकारचे लेखन केले आहे. अंतर्नाद, अनुभव, मिळून साऱ्याजणी इत्यादी मासिकांतून त्यांची विविध प्रकारच्या पुस्तकांवरील आस्वादक समीक्षा प्रकाशित होत असते. समीक्षेखेरीज त्यांचे जागतिकीकरणानंतरच्या कथा, गाडगीळांच्या कथानायिका... असे अभ्यासपूर्ण साहित्यविषयक लेख प्रकाशित झाले आहेत. पुस्तकांचे संपादन, संस्करण, शब्दांकन, अनुवाद अशी कामे त्या करीत असतात.

त्या कोथरूडच्या गांधी भवनजवळ अंध मुलींच्या शाळेत आणि वसतिगृहात जाऊन मुलींनी गोष्टी सांगत असत.

माधुरी तळवलकर या पुण्यातील टेल्को कंपनीत काही वर्षे नोकरी करत होत्या. या व्यतिरिक्त त्या पुण्याच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट डेव्हलपमेंट अँड रिसर्चमध्ये व सकाळ पेपर्समध्येही होत्या. स्त्री-वृत्त' नावाच्या मासिकाच्या साहाय्यक संपादक म्हणून त्या सुमारे वर्षभर काम करीत होत्या.

माधुरी तळवलकर यांची पुस्तके

[संपादन]
  • कळत जाते तसे (कथासंग्रह, ज्योत्स्ना प्रकाशन))
  • कॉल सेंटर डॉट कॉम (कॉलसेंटरमध्ये काम करणाऱ्यांच्या प्रत्यक्ष अनुभवांवर आधारलेली कादंबरी, - अक्षता प्रकाशन/राजेंद्र प्रकाशन)
  • कावळीणबाई आणि तिची पिल्ले (बालसाहित्य - व्यास क्रिएशन्स)
  • काळंपांढरं - (तीन दीर्घकथा)
  • घरोघरी (कादंबरी - राजेंद्र प्रकाशन )
  • ज्याचं त्याचं आभाळ (कादंबरी - राजे पब्लिकेशन्स)
  • तनहाई (कथासंग्रह - विश्‍वकर्मा प्रकाशन)
  • तळ्याचे गुपित (बालसाहित्य - ज्योत्स्ना प्रकाशन)
  • रानभूल (कादंबरी-विश्वकर्मा प्रकाशन) : याच नावाची रामचंद्र नलावडे यांची कादंबरी, डॉ.रमेश कुबल यांचे मार्गदर्शनपर पुस्तक, रंगराव बापू पाटील यांचा कथासंग्रह, प्रल्हाद जाधव यांचे निसर्गविषयक पुस्तक, ए. वि. जोशी यांचा कथासंग्रह आणि संजय सुरकर यांनी दिग्दर्शित केलेला एक मराठी चित्रपट आहे.
  • ललितरंग (समीक्षा/ललित - राजे पब्लिकेशन्स)
  • व्यक्तिमत्त्व फुलताना (माहितीपर) : या पुस्तकाला व्यवस्थापनतज्ज्ञ डॉ.प्र.चिं. शेजवलकर यांची प्रस्तावना आहे. पुस्तकात वेळव्यवस्थापन, ताणतणावांवर मात, वक्तृत्व इत्यादी विषयांवर उत्तम मार्गदर्शन केले आहे.- डायमंड पब्लिकेशन्स.

पुरस्कार

[संपादन]
  • कॉल सेंटर डॉट कॉम या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा उत्कृष्ट साहित्याचा पुरस्कार.
  • कॉल सेंटर डॉट कॉम या पुस्तकाला मृत्युंजय पुरस्कार
  • 1कैद’ नावाच्या कथेस गंगाधर गाडगीळ कथा पुरस्कार. ही कथा मिळून साऱ्याजणी मासिकाकडून ‘साऱ्याजणींच्या कथा’ या पुस्तकासाठी निवडली गेली.