मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम कन्या महाविद्यालय, कडेगाव (सांगली)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भारती विद्यापीठाचे मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम कन्या महाविद्यालय हे सांगली जिल्ह्यातील कडेगाव या गावातील महाविद्यालय आहे. याची स्थापना १७ जुलै १९९० रोजी संस्थापक डॉ. पतंगराव कदम यांनी केली. ग्रामीण भागातील मुलींना उच्च शिक्षणाची संधी येथे आहे. या महाविद्यालयात कला, वाणिज्य आणि विज्ञान या तीन विद्याशाखेतील पदवीपर्यंतचे शिक्षण मिळते. महाविद्यालय शिवाजी विद्यापीठाशी संलग्न आहे. महाविद्यालयाचे नॅक कडून पुनर्मुल्यांकन झाले असून दर्जा प्राप्त झाला आहे. महाविद्यालयाची स्वतःची इमारत आहे. महाविद्यालयाच्या वसतिगृहात सुमारे ३५० विद्यार्थिनींची राहण्याची सोय आहे. खेळासाठी क्रीडांगण तसेच जिमखाना उपलब्ध आहे तसेच प्रयोगशाळा आणि ग्रंथालयही आहेत.

वनस्पतीशास्त्र आणि मराठी या विषयातील पदवीत्तर शिक्षणाची सोय केली आहे. तसेच सुक्ष्मजीवशास्त्र, वनस्पती शास्त्र आणि भौतिकशास्त्र या विषयातील पीएच.डी. पर्यंतचे शिक्षण येथे मिळते.