Jump to content

माती प्रदूषण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
contaminación del suelo (es); Топырақтың ластануы (kk-kz); Jarðvegsmengun (is); Tepɔŋ atswhi anɛ esī (ybb); Pencemaran tanih (ms); kontaminasyon sa daga (bcl); توپىراقتىڭ لاستانۋى (kk-cn); د خاورې ککړتيا (ps); Замърсяване на почвата (bg); Toprak kirliliği (tr); Kontaminácia pôdy (sk); забруднення ґрунту (uk); mmetọ ala (ig); 土壤汙染 (zh-hant); 土壤污染 (zh-cn); 토양 오염 (ko); Топырақтың ластануы (kk); Загадување на почвата (mk); माटी प्रदूषण (bho); মাটি দূষণ (bn); pollution des sols (fr); माती प्रदूषण (mr); Ô nhiễm đất (vi); توپىراقتىڭ لاستانۋى (kk-arab); Topıraqtıñ lastanwı (kk-latn); Grondbesoedeling (af); Контаминација тла (sr); Топырақтың ластануы (kk-cyrl); Jordforureining (nn); Torpaqların ekocoğrafi problemləri (az); ನೆಲ ಮಾಲಿನ್ಯ (kn); soil contamination (en); تلوث التربة (ar); 陸地污染 (yue); talajszennyezés (hu); land pollution (gu); Lurraren kutsadura (eu); contaminación del suelu (ast); загрязнение почв (ru); Halogi'r pridd (cy); Inquinament del soeul (lmo); Kontaminimi i tokës (sq); آلودگی خاک (fa); 土地污染 (zh); Soil Contamination (dag); माटो प्रदूषण (ne); 土壌汚染 (ja); Gurɓatar ƙasa (ha); זיהום קרקע (he); туфракның пычрануы (tt); भूमालिन्यम् (sa); मृदा प्रदूषण (hi); bhoomi kalushyam (te); maaperän pilaantuminen (fi); ꯂꯩꯄꯥꯛ ꯂꯩꯍꯥꯎ ꯃꯥꯡꯊꯣꯛꯄ (mni); மண் மாசடைதல் (ta); inquinamento del suolo (it); Zanieczyszczenie gleby (pl); lìùndùl li bitěk (bas); poluição do solo (pt); มลพิษทางดิน (th); գրունտի աղուտավորում (hy); 土壤污染 (wuu); Bodenkontamination (de); onesnaževanje prsti (sl); pollucion del sòl (oc); ভূমি প্ৰদূষণ (as); contaminació del sòl (ca); Pencemaran tanah (id); Uharibifu wa ardhi (sw); മണ്ണ് മലിനീകരണം (ml); bodemverontreiniging (nl); Topıraqtıñ lastanwı (kk-tr); poluarea solului (ro); زميني گدلاڻ (sd); jordforurening (da); contaminación do solo (gl); kontaminace půdy (cs); Μόλυνση του εδάφους (el); Хөрсний бохирдол (mn) contaminación a cielo abierto (es); 污染的其中一種 (yue); contamination des sols par des agents chimiques nocifs d'origine humaine ou naturelle (fr); मानवी निर्मित रसायने किंवा इतर बदल जमीन प्रदूषण (mr); Belastung des Bodens mit giftigen Chemikalien (de); Besoediling van grond (af); 土壌中に人工活動による物質が、自然環境や人の健康・生活に影響がある程度に含まれている状態 (ja); polusyon sa daga na dara kan mga gibong-tawo mga kemikal asin iba pang pagbago (bcl); انسان جي ٺاهيل ڪيميائي يا ٻي ڦيرڦار ذريعي زمين جي آلودگي (sd); uchafuzi wa ardhi na kemikali zinazotengenezwa na binadamu au mabadiliko mengine (sw); cos'è? (it); mmetọ nke ala site na kemịkalụ mmadụ mere ma ọ bụ mgbanwe ndị ọzọ (ig); pollution of land by human-made chemicals or other alteration (en); प्रदूषण के प्रकार (hi); bhoomi kalushyam (te); maan pilaantuminen ihmisten tekemillä aineilla (fi); মানৱসৃষ্ট ৰাসায়নিক পদাৰ্থ বা অন্যান্য পৰিৱৰ্তনৰ দ্বাৰা ভূমি প্ৰদূষণ (as); تلوث تتعرض له التربة (ar); মাটির উর্বরতা শক্তি নষ্ট হওয়া (bn); кешеләр активлыгы яки табигый процесслар аркасында туфракларга зыян китерүче химик матдәләрнең эләгүе (tt) Contaminacion del suelo, Contaminación terrestre, Contaminacion de la tierra, Contaminacion terrestre (es); Sol pollué, Pollution du sol, Sols pollués, Sites et sols pollués, Sites pollués, Site pollué (fr); Contaminants del sòl (ca); Bodenverschmutzung, Bodenverunreinigung, Bodenkontaminationen (de); Contaminação do solo (pt); հողերի աղտոտում, Գրունտի աղուտավորում (hy); Замърсяване на почвите (bg); forurenet jord (da); poluarea solurilor, contaminarea solului, contaminarea solurilor (ro); Grunnforureining (nn); contaminacion del sòl (oc); Bodemvervuiling, Grondverontreiniging (nl); 土壤汙染物 (zh-hant); भूमि प्रदूषण, स्थल प्रदूषण (hi); Топырақтың химиялық ластануы (kk); 土壤污染物 (zh-cn); soil pollution (en); تلوث التربه (ar); Znečištění půdy (cs); onesnaźenje prsti (sl)
माती प्रदूषण 
मानवी निर्मित रसायने किंवा इतर बदल जमीन प्रदूषण
Halogiad pridd a achoswyd gan danciau storio tanddaearol yn cynnwys tar.
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारtype of pollution
उपवर्गप्रदूषण (माती)
स्थान माती
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

औद्यागिक सांडपाणी प्रक्रिया न करता आहे तसे जमिनीमध्ये सोडले जाते त्यामुळे माती प्रदूषण होते. तसेच शेतीमधील रासायनिक खतांचा अतिवापर व कचरा जाळल्यानेही माती प्रदूषण होते. जंगलतोडीमुळे झाडांची संख्या कमी होते त्यामुळे जमिनीची मोठ्या प्रमाणात धूप होते. हेही माती प्रदूषण होण्याचे कारण आहे.या प्रदूषणामुळे जमिनीखाली असलेले जीव जंतू मरतात. प्रदूषण स्रोत शोधून त्याचे निर्मूलन केले पाहिजे. . रासायनिक औषध चा वापर जास्त केल्यानी देखिल माती प्रदूषण होते


जमिनीवर नैसर्गिक घटक तसेच इमारती, रस्ते, वस्त्या, उद्योगधंदे, धरण प्रकल्प इ. सांस्कृतिक घटक असतात. हवा पाणी यांच्याप्रमाणे जमीन हाही उपयुक्त व महत्त्वाचा घटक आहे. पृथ्वीवरील जमिनीचा उपयोग, वापर विविध कारणासाठी केला जातो. त्यात वसाहती, शेती, वनस्पती, खाणकाम, उद्योगधंदे, जलसाठे इ.त्यादींचा समावेश होतो. काही जमीन लोकवस्ती, शेती विकासासाठी वापरली जाते. तर काही जमिनीवर पावसाअभावी वाळवंटे, ओसाड प्रदेश आहेत. काही ठिकाणी जमीन मैदानी वेगवेगळ्या मंद, तीव्र उताराची व पत्थरी व डोंगराळ असते, तर काही ठिकाणी जमीन बर्फाच्छादित असते. भुपृष्टावरील खडकाळ जमिनीवरील खडकांची झीज होऊन त्यापासून ‘मृदा’ (माती) निर्माण होते. त्यामुळे खडकातील मूळ गुणधर्म हे मृदेमध्ये आढळतात. मृदा ही सुपीक वा नापीक असते. या भूमीवरील माती किवा मृदा आपण वेगवेगळ्या कारणांसाठी उपयोगात आणतो. या मृदेला आर्द्रतेचा पुरवठा झाला की ती जमीन ही शेती वनस्पतीच्या, फळाफुलांच्या वाढीसाठी उपयुक्त बनते. या जमिनीवर सूर्यापासून मिळणारी उष्णताही परिणाम करते. म्हणजे अति थंड हवामानाच्या भागात मृदा बर्फाने आच्छादलेली असते. तेथील हिमक्षेत्रात शेती करता येत नाही. तर अति तीव्र उष्ण हवामानाच्या भागात मृदा ही ओसाड, नापीक, वाळवंटी असते. वाळवंटात पाण्याअभावी मृदा नापीक बनते. म्हणून योग्य हवामानात योग्य पाऊस मिळणाऱ्या भागात तसेच योग्य तापमानातील मृदा ही पिकांच्या, वनस्पतींच्या वाढीला योग्य असते. या मृदेतील अनेक खनिज घटक हे पिकांच्या व वनस्पतींच्या वाढीला पोषक असतात. खडकापासून मृदा निर्माण होण्यास हजारो वर्षाचा कालावधी लागतो.

वाढते शहरीकरण, वाढती कारखानदारी, वाढती लोकसंख्या यांच्यामुळे टाकाऊ विषारी पदार्थाची विल्हेवाट लावता येत नाही. ती जमिनीत लावावी लागते. त्यामुळे निसर्गातील जमीन/मृदा हा घटकही प्रदूषित होतो. त्यातून जमीन अपुरी पडते व त्यामुळे भूमिप्रदूषण समस्या निर्माण होतात. व त्यामुळे मृदेचा गैरवापर केला जातो.

मृदाप्रदूषणाची व भूप्रदूषणाची कारणे

[संपादन]

१) रासायनिक खते व कीटनाशके यांचा वापर-

रासायनिक घटक हे चांगले पीक यावे यासाठी जमिनीत शेतीसाठी वापरले जातात. रासायनिक खते, कीटकनाशके व इतर टाकाऊ पदार्थ जमिनीत मिसळल्याने जमिनीचा कस कमी होतो, व ती नापीक बनते. त्याचवेळी जमिनीतील शेतीसाठी उपयुक्त असलेल्या सूक्ष्म जीवजंतूंचा नाश होतो. कीटकनाशके ही जमिनीवरून पाण्यात प्रवेश करतात. शेतीतील पिकांमध्ये मिसळतात त्यामुळे शेतीच्या उत्पादनातही रासायनिक अंश मिसळतात. अन्नाद्वारे ती मानवी शरीरात प्रवेश करतात. रासायनिक खतांमुळे जमिनी नापीक व चोपड बनत चालल्या आहे. कीटकनाशकांतील टाकाऊ घटकांमध्ये हायड्रोजन सल्फाईड व सल्फरडाय ओक्साईड हे वायू तयार होऊन जमिनीतून दुर्गंधी येते.


२) शेतीतील सिंचन व मशागत पद्धतींचा वापर-

शेतीतील पिकांना विशेषतः नगदी, बागायती, व्यापारी पिकांना अवश्यकतेपेक्षा जास्त पाणी दिल्याने पाणी शेतात तुडुंब साचते. जमिनीच्या खालच्या थरातील क्षार हे वरच्या थरात केशाकर्षण पद्धतीने जमा असतात. या अनावश्यक पाण्यामुळेव मृदेचा वरचा थर खारट, नापीक व कडक बनतो. जास्त पाणी दिल्याने पीक चांगले येत नाही. पिकाला आवश्यक तेवढेच पाणी दिले पाहिजे. परंतु बहुसंख्य शेतकरी पाण्याचा अतिवापर करतात. उन्हाने तापलेल्या जमिनींना भेगा, तडे पडतात. शेतातील मशागतीत नांगरणी, कुळावणी, पेरणी, खुरपणी इ. प्रक्रिया केल्या जातात. हे काम शेतजमिनीच्या मगदुराला अनुसरून न केले तर पावसाच्या पाण्याबरोबर मातीतील सुपीक द्रव्ये उतरामुळे वाहून जातात व माती नापीक बनते. जमिनीत सलग तीच ती पिके घेतल्याने माती नापीक बनते. शेतकऱ्याचे या बाबतीत अज्ञान असल्यामुळे तसेच जुनाट पद्धदतीने शेती केल्यानेही मातीची सुपीकता घटते. पाणी, खते किती द्यावेत बियाणे चांगले कोणते वापरावे, इ. सर्वसामान्य माहिती शेतकऱ्याला असणे गरजेच असते.

मृदा प्रदूषणाचे परिणाम

[संपादन]

१) औद्योगिकीकरणाचे दुष्परिणाम : जमिनीवर टाकलेलेया उद्योगधंद्यातील टाकाऊ पदार्थ, कचरा व वापरात आणलेल्या रसायनिक टाकाऊ घटका यांच्या मिश्रणातून माती नापीक होते. शिवाय हवा पाण्याच्या व मृदेच्या प्रदूषणामुळे रोगांच्या साथी पसरतात हानिकारक किरणोत्सारी पदार्थ हे जलचर व जमीनीवरील वनस्पती, पिके यांच्याद्वारे मानवी शरीरात प्रवेश करतात. त्यात कार्बन, लोह, कोबाल्ट, झिंक इत्यादीचा समावेश असतो. या धातूंमुळे रोग पसरतात व कव्चित मृत्यूदेखील होतात..

२). वनस्पतींचे व जंगलतोडीचे परिणाम : जगात सर्वत्र कारखाने, वस्त्या, विविध प्रकल्पांच्या विकासासाठी शेतजमिनीवर व जंगल क्षेत्रावर आक्रमण झाले. व शेती क्षेत्र व जंगलक्षेत्र घटले. त्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरू शकत नाही. जंगले घटल्याने भूपृष्ठावरील हवामानात बदल होतो व तापमान वाढते. जमिनी ओसाड पडतात. असह्य उष्णतेने अनेक जीव बळी जातात. जमीन कोरडी नापीक होते. प्राणवायू व कार्बन डाय ओक्साईड यांचा समतोल ढासळतो. उताराच्या जमिनीवर जास्त पावसामुळे धूप होते.

मृदा प्रदूषणावरील उपाय

[संपादन]

१) जलसंचयन व वनस्पतिक्षेत्रात व जंगल क्षेत्रात वाढ करणे. : जमिनीची धूप थांबवण्यासाठी योग्य पद्धतीने ‘पाणी आडवा पाणी जिरवा’ योजना आखाव्यात. ताली बांधणे, बांध घालणे, बंधारे धरणे बांधणे, पाझर तलाव बांधणे व उताराला आडव्या दिशेने ताली घालणे, त्या क्षेत्रात लवकर लवकर वाढणाऱ्या वनस्पतींची भरपूर प्रमाणात लागवड करणे. पावसाचे पाणी जमिनीत मुरावे म्हणून जमिनीवर वृक्षांची लागवड करावी. कोणत्याही ठिकाणी, गावात जिल्ह्यात, राज्यात सर्वत्र एकूण क्षेत्रफळाच्या ३३% क्षेत्र जंगलाखाली असावे, असा पर्यावरणाचा नियम आहे. कारण त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन राखले जाते. पिकांना, वनस्पतींना गरजेपुरताच पाणी पुरवठा करावा. ठिबक सिंचनाने ९०% पाण्याची बचत होते, त्याला उत्तेजन द्यावे.

२) शेतीची योग्य मशागत पद्धती व शेती सिंचन : पिकांना त्यांच्या गरजे पुरतेच पाणी द्यावे पिकांच्या पाणी पुरवठ्याचे योग्य नियोजन करावे. शेतीला अतिरिक्त पाणी देऊन ते वाया घालऊ नये, पिकांचे नुकसान करू नये. शेतीतील पिके आलटून पालटून घेताना कस, मातीची सुपीकता वाढेल अशी पिके घ्यावीत. शेतीची मशागत उतारच्या दिशेने करू नये. नांगरणी, पेरणी आडव्या दिशेत करावी. शेतात सलग एकाच एक पीक घेऊ नये. मशागत आडव्या दिशेने करावी. जमिनीवर गवतांचे व वनस्पतीचे आच्छादन वाढवावे. मृदा सुपीक, निरोगी राहण्यासाठी जास्तीत जास्त शेणखत, नैसर्गिक खत वापरावे.

मातीचे प्रदूषण विषारी वायूंमुळेसुद्धा होते. तेव्व्हा अतिज्वलनामुळे व अन्य कारणांमुळे विषारी वायू निर्माण होणार नाहीत हे पहावे.