Jump to content

मांडूळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मांडूळ

शास्त्रीय वर्गीकरण
वंश: कणाधारी
जात: सरिसृप
कुळ: वायपरीडे
(Viperidae)

उपकुळ: वायपरीने
(Viperinae)

जातकुळी: [[]](Daboia)
जीव: [[]]
(Daboia russelii)

शास्त्रीय नाव
डाबोया रसेली


मांडोळ हा एक बिनविषारी साप आहे.

  • मराठी नाव- मांडूळ, दुतोंड्या(वर्धा),माटीखाया(विदर्भ),मालण(गोवा). इंग्रजी नाव-Earth Boa/ Red Sand Boa. शास्त्रीय नाव-Eryx johnii
  • सापांच्या सर्व प्रजातींमधील जमिनीवरील सर्पांतील लाजाळू व शांत स्वभावाचा हा साप आहे.मंद हालचाल,जाडसर शरीर, शेपटी व तोंडात जवळपास साम्य वाटत असल्याने याला दुतोंड्या असे नाव आहे. लालसर किंवा तपकिरी रंग, पोटाचा रंग फिकट तपकिरी.तोंड व शेपटी आखूड.डोळे लहान,बाहुली उभी.जमिनीत राहणारा. तोंड शरीराच्या मानाने बारके असल्यामुळे मातीत,वाळूत सहज शिरता येते. भक्ष्याभोवती विळखा घालून भक्ष्याचा जीव गेल्यावर भक्ष्य गिळतो.
  • सरासरी लांबी-75सें.मी.(2फूट 6इंच). अधिकतम लांबी-100सें.मी.(3फूट3इंच)
  • प्रजनन-ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान मादी एकावेळेस साधारण 6-9 पिलांना जन्म देते. पिलांचा रंग लालसर तपकिरी व त्यावर काळ्या रंगाचे पूर्ण गोलाकृती पट्टे. हे पट्टे कालांतराने नाहीसे होतात.
  • खाद्य-मुख्यतः उंदीर किंवा लहान सस्तन प्राणी,पाली.सऱडे,छोटे पक्षी
  • आढळ- महाराष्ट्रात सर्वत्र
  • वास्तव्य-मऊ जमिनीत बिळात राहणारा हा साप कोरड्या जागा पसंद करतो.पावसाळ्यात बिळात पाणी शिरल्यास जमिनीवर येतो.
  • वैशिष्ट्ये- निशाचर, तोंड व शेपटी साधारण सारखीच दिसते

.[१]

  1. ^ साप-निलीमकुमार खैरे, सर्प पृथ्वितलावरील एक आश्चर्य- अमित सय्यद