महाराष्ट्र केसरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

महाराष्ट्र केसरी ही महाराष्ट्र राज्यातील कुस्ती स्पर्धा आहे. या स्पर्धेची सुरुवात इ.स. १९६१ साली झाली.

सुरुवातीला स्पर्धेच्या बक्षिसाचे स्वरूप रोख रक्कम रूपात होते. इ.स.१९८२ पासून विजेत्यांना दीड किलो वजनाची चांदीची गदा देऊन गौरविण्यात येऊ लागले. अशी चांदीची पहिली गदा कुस्तीवीर मामासाहेब मोहोळ यांना मिळाली. २००८ पासून विजेत्यांना चांदीची गदा आणि ५१ हजार रुपये रोख रक्कम मिळू लागली. या स्पर्धेतील विजेते सरकारी नोकरीसाठी क्रीडा शेत्रातील राखीव जागांसाठी अर्ज करू शकतात.

२०१७ चा महाराष्ट्र केसरी किताब पुण्याचा अभिजित कटके याने मिळवला. मुंबईच्या नरसिंग यादव याने २०११ ते २०१३ असे सलग तीन किताब मिळवले तर २०१४ ते २०१६ चा महाराष्ट्र केसरी जळगावचा विजय चौधरी हा आहे.

2018 चा महाराष्ट्र केसरी विजेता बुलढाण्याचा बाला रफिक शेख हा आहे व उपविजेता पुण्याचा अभिजीत कटके हा आहे .