महाराष्ट्र-सारस्वत
महाराष्ट्र-सारस्वत हा वि. ल. भावे ह्यांनी लिहिलेला ग्रंथ मध्ययुगीन मराठी साहित्याच्या इतिहासाची मांडणी करणारा प्रसिद्ध ग्रंथ आहे. ह्या ग्रंथांच्या आजवर विविध आवृत्त्या प्रकाशित झालेल्या आढळतात. चौथ्या आवृत्तीला डॉ. शं. गो. तुळपुळे ह्यांनी लिहिलेली पुरवणी जोडण्यात आली होती. मध्ययुगीन साहित्याची मांडणी करणारा हा ग्रंथ त्याच्या ओघवत्या लेखनशैलीमुळे अधिक प्रसिद्ध आहे.
प्रकाशनाचा इतिहास
[संपादन]महाराष्ट्र-सारस्वत ह्या ग्रंथांची पहिली आवृत्ती विष्णू गोविेद विजापूरकर ह्यांच्या ग्रंथमाला ह्या मासिकातून मार्च १८९८ ते मे १८९९ ह्या कालावधीत क्रमशः प्रकाशित झाली. ही पहिली आवृत्ती म्हणजे ९८ पानी लहानसा निबंध असून तो १८९४ च्या सुमारास लिहिला असल्याचे सदर ग्रंथाच्या तिसऱ्या आवृत्तीच्या दुसऱ्या भागाच्या प्रस्तावनेत नोंदवण्यात आले आहे[१]. ह्या ग्रंथाची दुसरी आवृत्ती भारत-इतिहास-संशोधक मंडळाच्या ग्रंथमालेत १९१९ साली प्रकाशित करण्यात आली. ह्या ग्रंथाच्या तिसऱ्या आवृत्तीचा पहिला भाग १९२५ साली आणि दुसरा भाग १९२८ साली प्रकाशित झाला [२]. ह्या ग्रंथाची चवथी आवृत्ती १९५१ साली प्रकाशित करण्यात आली. ह्या आवृत्तीला तोवर झालेल्या संशोधनाच्या आधारे पुरवणी जोडण्याचे काम डॉ. शं. गो. तुळपुळे ह्यांनी केले[३].
संदर्भ
[संपादन]
संदर्भसूची
[संपादन]- भावे, विनायक लक्ष्मण (१९८२), महाराष्ट्र-सारस्वत, खंड १ (सहावी आवृत्ती ed.), मुंबई: पॉप्युलर प्रकाशन