अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद
Appearance
(महात्मा फुले समता प्रतिष्ठान या पानावरून पुनर्निर्देशित)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची स्थापना अध्यक्ष छगन भुजबळ यांनी १ नोव्हेंबर १९९२ रोजी केली. या परिषदेमार्फत महात्मा फुले समता पुरस्कार दिला जातो.
- २०१२चा महात्मा फुले समता पुरस्कार भालचंद्र मुणगेकर यांना प्रदान करण्यात आला.
- परिषदेने २८ नोव्हेंबर २०१२ रोजी, महात्मा जोतीराव फुले यांचा १२ फूट उंचीचा पूर्णाकृती पुतळा पुणे विद्यापीठास भेट दिला. हा पुतळा विद्यापीठाच्या प्रांगणातील मुख्य इमारतीच्या पाठीमागे उभारला गेला.
- अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या जालना येथील सन १९९३ च्या पहिल्याच मेळाव्यात ओबीसींसाठी देशात पहिल्यांदा महाराष्ट्र राज्यात मंडल आयोग लागु केला गेला. शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या मेळाव्यात छगन भुजबळांनी समता परिषदेचे विविध ठराव मांडले. त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतरणाचा ठरावसुद्धा होता. शरद पवारांनी त्याच ठिकाणी त्यावर ठोस भूमिका घेत, हे निर्णय एका महिन्यात देशात पहिल्यांदा महाराष्ट्र राज्यात लागु केले.
- समता परिषदेने देशभरात बिहार, राजस्थान, पंजाब, हरयाणा, आंध्रप्रदेश या राज्यांमध्ये ओबीसी समुदायाचे प्रश्न सुटावेत म्हणुन विशाल जनसंख्येचे यशस्वी मेळावे घेतले. त्यात दिल्ली येथे घेतलेली एकता महारॅली प्रचंड यशस्वी ठरली होती.