महागाव (गडहिंग्लज)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज गावात लहान लहान अशा बारा-तेरा गल्ल्या होत्या, कुंभार गल्ली, मराठा गल्ली वगैरे. त्या सर्व गल्ल्या एकत्र होऊन मोठे गाव वसले. त्या गावाला ‘महागाव’ हे नाव पडले. महागावाची लोकसंख्या वीस हजारांपर्यंत आहे.

रांगोळी[संपादन]

इ.स. १९८० साली महागावात रांगोळी कलेचा नव्याने पाया घातला गेला. व्ही.बी. पाटील, शिक्षक आनंद सुतार, महंमद बागवान या कलावंतांनी पारंपरिक प्रथा म्हणून असलेल्याली ‘रांगोळी’ ह्या कलेचा महागावात प्रसार केला. व्ही.बी. पाटील यांनी गावातील ‘बंड्या’ नावाच्या माणसाचे रांगोळीचित्र साकारले, तर आनंद सुतार यांनी ‘सरस्वती देवी’ आणि बागवान यांनी ‘लॅंडस्केप’. पण ते त्यात विशेषज्ञ झाले आणि रांगोळी कलेच्या नव्या माध्यमाची महागावाला ओळख झाली. आनंद सुतार हे निवृत्त शिक्षक आहेत. महंमद बागवान यांचा फोटोग्राफीचा स्टुडिओ आहे. व्ही. बी. पाटील हे अजूनही शिक्षक आहेत.