भिकाभाऊ राखे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

श्री. भिकाभाऊ राखे यांचा जन्म डिसेंबर ९२५ या साली परभणी जिल्ह्यातील वसा या गावी झाला. त्यांचे वडील शेतकरी होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण म्हणजे ४ थी पर्यंतचे शिक्षण गंगाखेड येथे झाले. त्या नंतरचे शिक्षण जिंतूर, सेलू, परभणी याठिकाणी झाले आणि ते पुन्हा अंबेजोगाई ला आले आणि मॅट्रिक पर्यत शिक्षण घेतले. त्यांचा विवाह श्रीमती द्वारकाबाई यांच्या सोबत इ. स १९४३ मध्ये झाला. त्यांना एकूण पाच अपत्य होती. चार मुले आणि एक मुलगी आज त्यांना वयाची ७६ वर्ष झाली त्याचे शरीर थोडे थकले आहे. त्यांच्या डोळ्याची आपरेशन्स झाल्यामुळे त्यांना कमी दिसते, पण आजही त्यांच्या मध्ये तोच उत्साह आहे जो तरुण वयात होता सध्या राखे गुरुजी त्यांचा मोठा मुलगा प्रा. अरविंद यांच्यासोबत जीवन व्यतीत करत आहे.

                 श्री. भिकाभाऊ राखे , गुरुजी श्री. योगेश्वरी नूतन विद्यालयात नौकरीसाठी इ. स १९५० रोजी आले , पण ते येथे येण्याअगोदरच भूमिगत राहून स्वतंत्र लढ्याचे कार्य अगदी जिद्दीने इ. स १९४२ ते १९५० या कालखंडात करत होते. सेलू येथील शाळेत असताना श्री. अनंतराव भालेराव मुख्याध्यापक असताना त्यांनी वृत्तपत्रात लेखन करण्यास सुरुवात केली. हैद्राबाद मधून प्रकाशित होणारे वृत्तपत्र मराठवाडा, बीड समाचार, गावकरी अशा अनेक वृत्तपत्रात लेखन केले. आपल्या लेखणीने स्वातंत्र्य लढ्याबद्दल प्रखर लेखन केले. त्यांचे हस्तक्षर नीटनेटके आणि सुंदर होते. त्यांच्या कामात सातत्य पण होते. त्यांनी केलेले कार्य अविस्मरणीय ठरले स्वतंत्र्य  सैनिकांचे गुण आणि त्याबद्दल आकर्षण आणि आपल्या लेखणीला काहीच काळातच अमोघ अस्त्र बनवले. त्यांच्या कार्यासाठी त्यांना पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी याच्या हस्ते स्वतंत्र्यसैनिक ताम्रपट आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक याच्या हाताने सन्मान पत्र देण्यात आले.
                दि.०१-०१-१९५० मध्ये ते सेवानिवृत्त झाले. आपले शिक्षण जरी अर्धवट सोडावे लागले तरी, त्यांच्या मनातील जिद्द, चिकाटी आणि समाजात परिवर्तन घडवून आणायची तीव्र इच्छा होती. योगेश्वरी शाळेत लिपिक पदावर असताना त्यांनी आपल्या पत्रकारितेची धार कमी होऊ दिली नाही. त्यांनी आपल्या कार्याने नवोदिता समोर आदर्श निर्माण केला गोविंदभाई यांचे मोलाचे मार्गदर्शन त्यांना लाभले.
                आपले शिक्षण अर्धवट सोडून इ. स.१९४२ मध्ये आंदोलनात भाग घेतलेले श्री. राखे, श्री. अनंतराव भालेराव, श्री. विनायकराव, हेही त्याच्या सोबत सहभागी होते. त्यांच्या पुढाकारणे अंबेजोगाई कराचे मनोगत व्यक्त झाले आणि तेथे शासकीय अध्यापक महाविद्यालय सुरू झाले. ते मराठवाड्यातील एक नामवंत विद्यालय आहे. आपल्या धारदार  लेखन कलेच्या माध्यमातून त्यांनी अनेक विद्यार्थ्यांच्या कल्यानाचे कार्य त्यांनी केले. १९५० मध्ये आसामला आलेल्या भूकंप ग्रस्त लोकांकरिता निधी गोळा केला.
            आपले शिक्षण अर्धवट सोडून समाजाचे बंधने स्वीकारून समाजात जागृती करण्याचे कार्य केले. पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो. श्री. भिकाभाऊ राखे यांनी लक्षात राहावे म्हणून दरवर्षी अंबेजोगाई येथे पत्रकाराना भिकाभाऊ राखे पत्रकार पुरस्कार दिला जातो.
            संदर्भ:-

भाले राम,कोरान्ने शोभा,देशपांडे वृंदा,धारूरकर शुभदा,कोरान्ने आशा ( संपा ), ( २०१२ ), हैद्राबाद मुक्ती संग्रामातील पूर्ण वेळ कार्यकर्ते, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्था, औरंगाबाद ,प्रथम आवृत्ती पृ.१०३,१०४,१०५,१०६.