Jump to content

मध्यराशिमेघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इंग्रजी नाव - Altocumulus Cloud

इंग्रजी खुण - Ac

मेघतळ पातळी मध्य

२००० ते ७००० मीटर

आढळ जगभर सर्वत्र
काळ संपूर्ण वर्षभर
पुण्याच्या आकाशातील मध्यराशीमेघ

हे मध्य पातळीवर आढळणारे पांढऱ्या किंवा राखाडी रंगाचे ढग  मुख्यतः सूक्ष्म जलबिंदूचे बनलेले असून छोट्या छोट्या ढगांच्या पुंजक्यांच्या आकारात दिसतात. तंतुराशीमेघांपेक्षा ह्या ढगांचे मेघ घटक  मोठे दिसतात. हे ढग नेहमी अनेक रेषांच्या किंवा लहरींच्या समूहात पाहायला मिळतात. दुपारी आकाशात हे ढग असल्यास त्यांची सावली खाली पडू शकते.[] काही वेळा ह्या ढगांची व्याप्ती संपूर्ण आकाशभरही असू शकते पण ह्या ढगांमुळे सूर्याभोवती वलय मात्र पाहायला मिळत नाही. कधीकधी ढगांच्या कडा  कमी जाडीच्या आणि तंतुमय असल्यास ह्या कडातून प्रकाश किरणांचे विकिरण होऊन ह्या कडांना वेगवेगळे रंग मिळालेले दिसतात. ह्या ढगातून सूर्यकिरण खालवर पोहोचत नसल्यामुळे ह्या ढगांचे तळ नेहमी काळसर दिसतात.[]

दिवसा खूप तापलेला पृथ्वीचा पृष्ठभाग रात्री उष्णता उत्सर्जित करतो. त्यामुळे त्याच्या संपर्कातील आर्द्रतायुक्त हवा वरवर जाऊन थंड होते आणि त्यामुळे त्यातील जलबिंदूचे हे ढग रात्रीतून तयार होतात. मात्र दिवस उजाडल्यावर त्यावर सूर्याचे किरण पडल्याने  त्यातील उष्णतेने जलबिंदूची वाफ होऊन असे ढग नाहीसे होतात.[]

शिखरी मध्यराशीमेघ [Altocumulus Castellanus ] ह्या प्रकारचे ढग तयार होणं हे अस्थिर हवेचं आणि त्यामुळे येऊ घातलेल्या गडगडाटी वादळाचं चिन्ह मानलं जातं.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b c मध्यम पातळीवरील मेघ - मध्यराशी मेघ. मराठी विश्वकोश.
  2. ^ DK Earth The Definitive Visual Guide. Sept 2013. p. 480. ISBN 978-1-4093-3285-5. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)