मडप
महाराष्ट्रातल्या रायगड (कुलाबा) जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात मंडप नावाचे खेडेगाव आहे. या गावाच्या ग्राम पंचायतीला 'मडप ग्राम पंचायत' म्हणतात.
सन २०११ च्या खानेसुमारीसाठी मंडप गावाला ५५३७७१ हा क्रमांक दिला होता. गावाचा पिन कोड ४१०२०१ आहे.
मंडप गाव खालापूरपासून ६ किलोमीटरवर तर अलिबाग या जिल्ह्याच्या मुख्यालयापासून ६० किमी अंतरावर आहे. मुंबई–पुणे द्रुतगतिमार्ग मंडप गावातून व मडप बोगद्यातून जातो.
मंडप गावाचे क्षेत्रफळ ६७९ हेक्टर असून तेथे २०१९ साली ७२१ पुरुष व ६९२ स्त्रिया धरून एकूण १४१३ माणसे रहात होती. गावात एकूण ३०१ घरे आहेत. सर्वात जवळचे मोठे नगर खोपोली; हे २७ किमीवर आहे.
मडप गावात देवळे, मशिदी, शाळा, काॅलेजे, रुग्णालये, पोलीस स्टेशन, उपाहारगृहे, हाॅटेले, पेट्रोल पंप, चित्रपटगृहे, बँका, एटीएम्स आहेत.
जवळची रेल्वे स्थानके : चौक आणि केळवली.
मंडप गाव कर्जत विधानसभा मतदारसंघात व मावळ लोकसभा क्षेत्रात येते.
मंडप गावाजवळची खेडी
[संपादन]- अडोशी
- कुंभिवली (४ किमी)
- खारसुंदी
- चिंचोलो गोहे
- धमणी
- निफण
- पौढ
- मंदाड अटकरगाव
- सरसण
- सावरोली
- होनाड
मंडप गावाजवळची प्रमुख ठिकाणे
[संपादन]- एकवीरा हाॅटेल (०.७ किमी)
- एक्सप्रेस सिटी घरबांधणी कंपनी (Buiders)
- बाॅम्बे बदक संगोपन केंद्र (२ किमी)
- मडप धबधबा -१, व मडप धबधबा - २.
- मडप बोगदा
- मडपाई धाबा (एक किमी)