मंगेश तेंडुलकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मंगेश तेंडुलकर (निधन : पुणे, ११ जुलै, २०१७) हे एक मराठी हास्य-व्यंग्य-चित्रकार असून त्यांनी काही विनोदी पुस्तकेही लिहिली आहेत. त्यांचे अनेक ललित लेख नियतकालिकांमधून प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या व्यंगचित्रांचीं अनेकदा प्रदर्शने भरत. त्यांच्या हस्ते पुस्तकांची उद्‌घाटने होत. ते व्याख्यातेही होते.मंगेश तेंडुलकर हे प्रसिद्ध मराठी नाटककार विजय तेंडुलकर यांचे लहान बंधू आहेत. मंगेश तेंडुलकर यांना रघुनाथ तेंडुलकर , लीला तेंडुलकर , विजय तेंडुलकर व जेष्ठ अर्थशास्त्रज्ञ सुरेश तेंडुलकर ही भावंडे होती.

तेंडुलकर एक उत्तम वाचक होते. त्यांनी आपल्या व्यंगचित्रांच्या दुनियेमध्ये रमताना पुस्तकांशी फारकत घेतली नव्हती. वडिलांचे पुस्तकांचे दुकान असल्याने त्यांना वाचनाची लहापणापासूनच सवय होती. सुरुवातील नोकरी व्यवसाय करता करता व्यंगचित्रे काढणाऱ्या तेंडुकलकरांनी वाचन आणि व्यंगचित्रे अशा दोन्ही आवड एकाच वेळेस जोपासल्या होत्या. वयाच्या साठीनंतर त्यांनी कॅरिकेचर प्रकार हाताळला; तसेच वयाच्या साठीनंतर त्यांनी महाभारत आणि मनाचे श्लोक वाचायला घेतले. वाचनाला वय, वेळ, काळाचे कोणतेही बंधन नाही आणि वाचन हे महत्त्वाचे आहे असे तेंडुलकर म्हणत.

पुस्तके[संपादन]

  • भुईचक्र
  • रंगरेषा व्यंगरेषा (आत्मचरित्र)
  • संडे मूड : (५३ लेख आणि जवळपास तेवढीच व्यंगचित्रे असलेले पुस्तक)

वर्तमानपत्रांतून, नियतकालिकांमधून किंवा दिवाळी अंकांमधून प्रसिद्ध झालेले लेख[संपादन]

  • अतिक्रमण (मंगेश तेंडुलकर) [१] Archived 2013-10-09 at the Wayback Machine.
  • आमच्या पुण्यातील नाट्यगृहे (जत्रा, १९९८)
  • कुणी पंपतो अजून काळोख... (मंगेश तेंडुलकर) [२][permanent dead link]
  • चौकटीतल्या आत्म्याला (आवाज, दिवाळी अंक २००३)
  • ’बित्तेशां?' 'दांकेशां!' (मंगेश तेंडुलकर) [३][permanent dead link]
  • बिचाऱ्या अफझलचे महाराजांस पत्र (जत्रा, १९८९)
  • माझ्या गोव्याच्या भूमीत! (गोमांतक, दिवाळी अंक २००३)
  • मोबाईल फ्री (श्री दीपलक्ष्मी, दिवाळी अंक २००३)
  • व्यंगचित्र हेच पहिलं प्रेम (ग्राहकहित, दिवाळी अंक २००३)
  • व्यंगचित्रांची भाषा (कुटुंब...च कौटुंबिक, दिवाळी अंक २००३)
  • व्यंगचित्रांतून संवाद साधताना (छात्र प्रबोधन, दिवाळी अंक २००३)
  • व्यंगचित्रे ही कला नाहीच (किस्त्रीम, दिवाळी अंक २००३)

पुरस्कार[१][संपादन]

  1. ^ "संग्रहित प्रत". Archived from the original on 2017-02-07. 2016-07-23 रोजी पाहिले.