मंगळ अन्वेषण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Copyright-problem paste.svg
या लेखातील मजकूर / विभागातील मजकूर [१] फेसबुक येथून कॉपी-पेस्ट करून उतरवल्याप्रमाणे वाटत आहे आणि हा प्रकार संभाव्य प्रताधिकारभंग ठरण्याची शक्यता आहे.
या लेखातील अ-मुक्त, प्रताधिकारित आशय हटवायला आणि प्रताधिकारमुक्त आशय भरायला ह्या लेखाचे संपादन करावे. यथोचित संपादन झाल्यावर हा साचा येथून काढावा.(१२/०९/२०१६)
मंगळ हा सूर्यमालेतील चौथा ग्रह आहे. त्याच्या तांबड्या रंगामुळे त्याला तांबडा ग्रह असे सुद्धा म्हटले जाते. हा तांबडा रंग त्याला आयर्न ऑक्साईडमुळे मिळाला आहे. हा एक खडकाळ ग्रह (terrestrial planet) असून त्यावरील वातावरण विरळ आहे. मंगळ ग्रहाचा पृष्ठभाग चंद्राप्रमाणे अनेक विवरे तसेच पृथ्वीप्रमाणे अनेक ज्वालामुखी, दऱ्या, वाळवंट व ध्रुवीय बर्फ यांचा बनला आहे. सूर्यमालेतील सर्वांत उंच पर्वत ऑलिंपस मॉन्स तसेच सर्वांत मोठी दरी व्हॅलेस मरिनेरिस मंगळावरच आहे. तसेच जून २००८ मध्ये नेचर मासिकात प्रकाशित झालेल्या तीन लेखांनुसार मंगळावर एक प्रचंड मोठे विवर असल्याचा पुरावा मिळाला आहे. हे विवर १०,६०० X ८,५०० किमी अकाराचे असून ते साउथ पोल - ऐटकेन बेसिन या सद्ध्याच्या ज्ञात सर्वांत मोठ्या विवरापेक्षा चारपट मोठे आहे. भूपृष्ठीय गुणधर्मांप्रमाणेच मंगळाचा परिवलन काळ तसेच ऋतुचक्र पृथ्वीसारखेच आहेत.

१९६५ मध्ये पहिल्यांदा मरीनर ४ हे अंतराळायान मंगळाजवळून गेले. त्यापूर्वी मंगळाच्या पृष्ठभागावर पाणी असावे असा समज होता. याचे मुख्य कारण म्हणजे मंगळाच्या ध्रुवीय भागाचे निरिक्षण करतांना आढळलेले बदलत जाणारे फिके व गडद पट्टे, जे संशोधकांना महासागर व खंड असावेत असे वाटले. तसेच मंगळावरील काही निमूळते व गडद पट्टे सिंचनासाठीचे पाण्याचे कालवे असल्याचाही काहींचा समज होता. नंतर हे पट्टे मंगळावर अस्तित्वातच नाही आहेत व केवळ ऑप्टिकल इल्यूजन मुळे ते दिसतात असे स्पष्टिकरण देण्यात आले. पण तरीही, इतर ग्रहांच्या तुलनेत मंगळ बराचसा पृथ्वीसारखा असून, जर सूर्यमालेत इतरत्र कुठे पाणी व जीवन असेल तर ते मंगळावरच असण्याची सर्वाधिक शक्यता आहे. बर्फाच्या स्वरूपातील पाणी जुलै ३१, २००८ रोजी फोनिक्स मार्स लॅंडरला मंगळावर आढळले होते.

मंगळावर शोध शतकांपासून पासून चालू आहे, १६०० पासून तेलेस्कॉपे च्या शोधानंतर मंगळवारच्या घडामोडी मनुष्याला बारकी ने पाहता आल्या पृथ्वी वरून मंगळाच्या वातावरण आणि संभावित जीव जंतू चा शोध सोपा झाला आहे मंगळावर बरेच शोध्यान पाठवलेले आहे विसाव्या षटका पासून मानाग्लावर मनुष्य ज्ञान खूप वाढला आहे मुख्य क्षेत्रा बद्दल माहिती आणि तिथल्या परिस्थिती ची माहिती ग्रह विज्ञान खूप किचकट आहे म्हणून मार्स एक्ष्प्लोरतिओन मध्ये खूप निस्श्फल्लता आल्या मुख्यातर सुरवाती च्या शोधन मध्ये जवळ जवळ two -third अवकाशयान मंगळावर पोहचू शकले नाहीत आणि काही पोहचून पण काही शोध करू शकले नाही आहे पण सगळी कामगिरी चुकली नाही उधरानार्थ twin mars exploration रोवेर्स खूप वर्षांपर्यंत आपला काम करीत होते. ६ ऑगस्ट २००६ पासून दोन रोवेर्स मंगळावरील माहिती पृथ्वी वर पाठवत आहे आणि तीन orbitors ग्रह वर पाहणी करत आहे - Mars Odyssey, Mars Express, and Mars Reconnaissance Orbiter. आज पर्यंत एकही sample गोळा करण्यासाठी यान मंगळावर पाठवला नाही आहे आणि एक यान (Fobos-Grunt)sample आणू शकले नाही आहे.

नवीन कार्य[संपादन]

नासा ने Mars Odyssey २००१ मध्ये मंगळाच्या क्क्सश्या सोडले आहे. ह्या याना ने Gamma Ray Spectrometer ने मंगळावर बाहेरील क्षेत्रात ह्य्द्रोगेन चे प्रमाण जास्त असल्याची माहिती घेतली हे ह्य्द्रोगेन मुख्यातर बार्फाच्या माध्यमात असल्याचे समजले जाते. Mars Express चे कार्य २००३ पासून चालू आहे हे कार्य European Space Agency (ESA) सांभाळत आहे. त्यांनी Beagle २ पण मंगळावर पाठवले आहे. ज्याच्या बद्दल माहिती आहे कि हे यान february २००४ मध्ये हरवला आहे. २००४ च्या सुरवातीला ह्या याना ने मंगळावर methane चा शोध लावला. ESA ने २००६ मध्ये मंगळावर aurorae चा शोध लावला. january २००४ मध्ये नासाचे यान Spirit (MER-A) मंगळावर पोहचले. ह्या याना ने आपले कार्य पूर्ण केले मंगळवारच्या वैज्ञानिक शोधनपैकी एक महत्त्वाचा शोध होता. कि मंगळावर पूर्वी कधी तरी पाणी होतं हे दोन अवकाशयान यानी शोध लावला. मंगळासंबंधीच धूळ वादळ आणि वारा वादळांनी बरेच यान नाष्ट केले आहे. त्यापैकी एक spirit rover आहे जे कि २०१० पर्यंत कर्यारात होतं. मार्च १०, २००६ लआ Mars Reconnaissance Orbiter मंगळाच्या कक्षेत पोहोचला जो कि दोन वर्षाच्या मोहिमेवर आहे हे यान मंगळाच्या भूभाग आणि हवामान ची माहिती देतं जी माहिती पुढच्या यानच्या कामात येईल. ह्या यानाने मंगळाच्या पहिल्या अव्धाव ची चित्र पाठवली असे वैज्ञानिक माहिती आहे. Mars Science Laboratory चे कार्य नोव्हेंबर २६, २०११ ला चालू झाले आणि त्याने Curiosity Rover मंगळावर ऑगस्ट ६,२०१२ ला पाठवला ,हे यान बाकी सगळ्या यानांपेक्षा प्रगतीशील आहे . हे यान ९०metre per hour च्या गतीने उडू शकतं ह्या प्रयोगात laser रसायन तंत्र आहे जे कि खडक निर्मिती ची माहिती देतं. ७ metres पर्यंत

भविष्यातील मोहिमा[संपादन]

सप्टेंबर १५,२००८ रोजी नासाने मेव्हन या २०१३ मधील मंगळाच्या वातावरणाबद्दल माहिती गोळा करण्यासाठी नियोजित केल्याची घोषणा केली. मेटनेट या फिनिश-रशियन मोहिमेदरम्यान मंगळाच्या पृष्ठभागावर दहाहून अधिक छोटी-छोटी स्वयंचलित वाहने उतरविण्यात येतील. याद्वारे मंगळाचे वातावरण, भौतिकशास्त्र व हवामानशास्त्र यांचा अभ्यास करण्यासाठी दूरवर पसरलेले एक जाळे तयार करण्यात येईल. या मोहिमेची नांदी म्हणून २००९ किंवा २०११ मध्ये एक किंवा काही थोडे लॅंडर प्रक्षेपित करण्यात येतील. हे लॅंडर रशियाच्या फोबॉस-ग्रंट यानाच्या पाठीवर वाहून नेले जाण्याची शक्यता आहे. या मोहिमेतील इतर प्रक्षेपणे २०१९ पर्यंत टप्प्याटप्प्यात करण्यात येतील. २००४ मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश यांनी "व्हिजन फॉर स्पेस एक्स्प्लोरेशन" याची घोषणा केली. यामध्ये मंगळावरील मानवी मोहीम हे प्रमुख ध्येय म्हणून नमुद केले होते. नासा आणि लॉकहीड मार्टिन संस्थेने ओरायन या अवकाशयानाची (ज्याला पूर्वी क्र्यू एक्स्प्लोरेशन वेहिकल म्हटले जात असे) बांधणी सुरू केली आहे. याद्वारे २०२० पर्यंत चंद्रावर मानवी मोहीम पाठविण्याचे नियोजित करण्यात आले आहे. ओरायनची चंद्रावरील मोहीम त्याच्या पुढील मंगळावरील मोहिमेचा एक टप्पा असेल. सप्टेंबर २८, २००७ रोजी नासाचे व्यवस्थापक मायकल डी.ग्रिफिन यांनी सांगितले की २०३७ पर्यंत मंगळावर माणूस उतरवण्याचे नासाचे ध्येय आहे. इस्रोची अपेक्षा आहे की ते २०३० ते २०३५ दरम्यान मंगळावर माणसास उतरवू शकतील. तत्पूर्वी मंगळावर अधिकाधिक मोठी याने पाठविण्यात येतील, ज्यांची सुरुवात एक्झोमार्स व मार्स सॅंपल रिटर्न मोहीम यांच्यापासून होईल. Martian System मंगळ हा मनुष्याचा आवडता विषय राहिला आहे. प्रत्येक दुर्दर्शिचीत्र मंगळाच्या जमिनीवर रंगाचा बदल दाखवत आहे, हंगामी वनस्पती मुळे होत आहे. असे पूर्वीची बरीच माहिई मुले मंगला बद्दल मनुष्याचा कल वाढत गेला. नंतर मंगळाच्या दोन चंद्र बद्दल माहिती मिळाली Phobos आणि Deimos, ध्रुवीय बर्फ ज्याला आता ओल्य्म्पूस मोन्स म्हंटले जाते. हे सूर्य मालिकेत सर्वात उंच पर्वत आहे. ह्या शोधाने पुढील मोहिमांना अधिक वेग देला. मंगल हा एक खडक असलेला पृथ्वी सारखा ग्रह आहे. जो पृथ्वीच्या काळात बनला होता. पण पृथ्वीचा व्यास मंगला पेक्षा दुप्पट आहे. मंगळावर हवामान थंड आणि वाल्वंता आहे. पण महत्त्वाचा आहे कि ह्या ग्रह वर पृथ्वी येवदीच जमीन आहे.

मंगळावरून खगोलीय निरीक्षण[संपादन]

मंगळावर पाठविण्यात आलेल्या अनेक ऑर्बिटर, लॅंडर व रोव्हर यामुळे आता मंगळाच्या आकाशातील खगोलशास्त्राचा अभ्यास करणे शक्य झाले आहे. मंगळावरून पृथ्वी व चंद्र विनासायास दिसतात. मंगळाचा उपग्रह फोबॉस पृथ्वीवरून दिसणार्‍या पूर्ण-चंद्राच्या कोनीय व्यासाच्या एक तृतीयांश आकाराचा दिसतो. याविरूद्ध डिमॉस तार्‍यासारखा दिसतो व पृथ्वीवरून दिसणार्‍या शुक्रापेक्षा थोडा अधिक तेजस्वी दिसतो.तसेच उल्का व अरोरा यासारखे सुपरिचित आकाशातील घटना मंगळावरही बघण्यात आल्या आहेत. मंगळावर नोव्हेंबर १०, २०८४ रोजी पृथ्वीचे संकम्रण दिसून येईल. यासोबतच मंगळावर बुधाचे संक्रमण व शुक्राचे संक्रमण दिसून येतात तसेच मंगळाचा उपग्रह डिमॉस खूप लहान असल्यामुळे त्याच्यामुळे होणाऱ्या खंडग्रास सूर्यग्रहणास संक्रमण म्हणणेच योग्य ठरेल.

चित्रदालन[संपादन]

  1. ^ संदर्भाचा संदर्भhttp://indiacode.nic.in/fullact1.asp?tfnm=196123 हे संस्थळ २० एप्रील २०१४ रोजी सायं १७ वाजून १५ मिनीटांनी जसे अभ्यासले