Jump to content

मंगळवार पेठ (सोलापूर)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मंगळवार पेठ, सोलापुर या पानावरून पुनर्निर्देशित)

मंगळवार पेठ आणि सोलापूरचे पारंपारिक वतनदार शेटे घराणे : सोलापूरच्या प्रत्येक परिसराला एक वेगळी पंरपंरा आणि उज्जवल इतिहास आहे.मंगळवार पेठ ही शहराची आर्थिक बाजू म्हणून ओळखली जाते. सोलापूरची सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते.शहरातील वेगवेगळ्या परिसराला आणि पेठेला वाराचे नाव देण्याची पंरपंरा ही पेशव्यांच्याही पूर्वी पासूनची होती.दिलेली नावे लक्षात ठेवण्यास सोपी जावी म्हणून आणि या पेठांची रचना नागरिकांना रोजचे व्यवहार सुरळीत व्हावी,अशा पद्धतीने केली जात होती.आंध्रप्रदेश,कनॉंटक या दोन राज्याच्या सीमेवर असलेले सोलापूर हे व्यापारी पेठ म्हणून उदयास आले. सुरुवातीस केवळ 150 एकर मध्ये वसलेल्या सोलापूर मध्ये बाजारपेठ वसवण्या साठी जागा अत्यंत अपूरी असल्याने व्यापाऱ्यांच्या द्रष्टीने नवी जागा शोधण्यास सुरुवात केली. मंगळवार पेठ देखील कसबा सोलापूर चाच भाग होता.श्रीमंत माधवराव पेशव्यांनी सोलापूरचे किल्लेदार उद्धव वीरेश्वर यांच्यासह सोलापूरचे पारंपारिक वतनदार देशमुख,जगदेवपा शेटे, देशपांडे यांच्याशी याबाबत चर्चा करून नवीन बाजारपेठ वसविण्याबाबत सूचना केली.1768 साली किल्लेदार वीरेश्वर यांनी मधला मारुतीच्या पाठीमागील सुमारे 73 एकर जागा शहरातील वतनदार जगदेवप्पा शेटे यांच्या मालकीची जागा व्यवसाय वाढीसाठी नियुक्त केली.सोलापूरचा विस्तार त्याकाळी सावरगाव डोंगरापर्यंत होता.जगदेवप्पा शेटे यांच्याकडे सावरगाव तसेच नळदुर्ग ठाणे यांची देखील वतनदारी व जहागिरी होती. त्याकाळी अत्यंत धाडसी तसेच व्यवहारचातुर्य असे जगदेवप्पा शेटे यांनी या ठिकाणी नवीन व्यापारीपेठ वसविण्यासाठी कार्यवाही सुरू केली. यादरम्यान माधवराव पेशवे यांनी सोलापूरला भेट दिली.येथील वतनदार, किल्लेदार यांच्या समवेत झालेल्या चर्चेअंति या 73 एकरामध्ये वसलेल्या नव्या बाजारपेठेला 'माधवपेठ' असे नाव देण्याचे एकमताने ठरले.मधला मारूतीपासून तुळजापूर वेशीपर्यत शेळगी गावठाण पर्यंत व कुंभार वेशीपासून ते बाळीवेस मारुती तसेच शतकेश्वर लिंगापर्यंत अशी या पेठेची चतुःसीमा ठरविण्यात आली. या बाजारपेठेसंबंधीचे सर्व अधिकार जगदेवप्पा शेटे यांना देण्यात आले.जगदेवप्पा शेटे यांनी मुख्य पेठेत चार दिशेला चार मारुती मंदिराची प्रतिष्ठापना केली. कुंभारवेस मारुती,बाळीवेस मारुती, तुळजापूर वेस मारुती व मधला मारुतीची स्थापना केली. पेठेच्या मधोमध शेटे यांनी वाडा बांधला.मोठ्या बाजरपेठेची निर्मिती केली.विविध जातीधर्माच्या लोकांना व्यवसाय करिता जागा उपलब्ध करून दिली.फलटण भागातील व्यापाऱ्यानिमित्त आलेल्या मारवाडी गुज्जर लोकांना व्यवसायाकरिता फलटण गल्लीत जागा दिली. केवळ 25-30 वर्षामध्ये माधवपेठेत व्यापाराचा मोठ्या प्रमाणावर विस्तार होण्यास सुरुवात झाली. शेजारच्या दोन्ही राज्यातून आणि महाराष्ट्राच्या विविध भागातून माल विकण्यासाठी व्यापाऱ्यांची ये-जा सुरू झाली. त्यामुळे ही पेठ पूर्णपणे गजबजली.सोलापूरचा सर्वात मोठा बाजार हा दर मंगळवारी भरत असे.हा बाजार खूप मोठा असतो म्हणून बाहेरील गावातील लोक मंगळवारी सोलापूर मध्ये येत असतात मधला मारूतीच्या पिछाडीस असलेल्या मोकळ्या जागेत हा बाजार भरायचा.याच ठिकाणी ही नवीन पेठ स्थापन झाल्यानंतर मंगळवारी भरण्याऱ्या आठवडी बाजाराची उलाढाल मोठ्या प्रमाणात वाढली व पुढे या बाजाराचे नाव 'माधवपेठ' ऐवजी 'मंगळवारपेठ'असे बदलले गेले.ते आज पूर्व आणि पश्चिम मंगळवारपेठ असे ओळखले जाते.मंगळवार पेठेतील मधला मारुती मंदिरातील ऐतिहासिक मारुतीच्या मूर्तीच्या मागील बाजूस शिव पार्वती विवाह पुराण कोरण्यात आले आहे. अशी ऐतिहासिक शिल्प मंगळवार पेठेत आहे.मंगळवार पेठेतील वतनदार शेटे यांच्या वाड्यात श्रीमंत माधवराव पेशवे बाजारपेठ तसेच मंदिर बाबतीत चर्चेसाठी येत असत. शेटे घराण्यातील दुसरे जगदेवप्पा यांनी वारद घराण्यातील व्यक्तीला व्यवसाय वाढीसाठी सोलापूरात आणले व त्यांना शेटे वाड्यासमोरील जागा राहण्यास दिली.सोलापूरची पहिली नगरपालिका भाड्याने याच मंगळवार पेठेतील शेटे यांच्या वाड्याबाहेरील आठ खण जागेत होती.आजही वतनदार शेटे घराण्यातील वारसदार बाळासाहेब उर्फ सिद्धेश्वर मल्लिकार्जुनप्पा शेटे यांच्याकडे अनेक ऐतिहासिक कागदपत्रे तसेच शेकडो अंदाजे 300 वर्षांपूर्वीचे शस्त्र पाहवयास मिळतात.वतन दार शेटे घराणे हे अत्यंत जुने घराणे आहे. आद्यपंचपिठाधिशांनी हजारो वर्षांपूर्वी याच शेटे घराण्यास वीरशैव परंपरेतील सर्व धार्मिक अधिकार मान सन्मान दिलेला आहे.लग्नकार्यातील पूजेतील पंच कलशपैकी पहिला कलश घेण्याचे तसेच सर्व धार्मिक विधिना मान्यता देणे बाबत शेटे यांना मान आहे.वीरशैव लिंगायत समाजाचा प्रमुख व्यक्ती हा शेटे आहे.त्यामुळे गावातील ग्रामदैवत श्री सिद्धारामेश्वर महाराजांच्या जत्रेत शेटे घराण्यास मोठा मान आहे.चालुक्य काळापूर्वीपासून म्हणजेच अंदाजे 1200-1300 वर्षांपूर्वीपासून या शेटे घराण्याचा इतिहास दिसून येतो.