भूमिहीन ग्रामीण कामगार चळवळ
Appearance
भूमीहीन ग्रामीण कामगार चळवळ (भू.का.च., Movimento dos Trabalhadores Rurais Sem Terra, MST) ही ब्राझील या देशातील भूमीहीन मजूर वर्गाला जमीन कसण्याचे हक्क मिळवून देण्यासाठी सुरू झालेली समाज-राजकीय चळवळ आहे. ही चळवळ साधारणतः १९७० च्या दशकात ब्राझीलमधील लष्करशाही सरकारने लादलेल्या शेती सुधारणेच्या साच्याला विरोध करण्यासाठी उदयास आली. ब्राझील सरकारच्या या शेती सुधारणेच्या धोरणात अतिरिक्त लोकसंख्येचे स्थलांतर आणि सामरिक एकीकरणाच्या उद्देशाने दुर्गम भागातील बेवारस जमिनींच्या वसाहतीकरणाला प्राधान्य देण्यात आले होते. या धोरणाच्या विरुद्ध भू.का. चळवळीने अनुत्पादक जमिनींच्या पुनर्वाटणीविषयी मुलभूत शोध सुरू केला.
शेतीविषयक आघाडी, पुढाकाराच्या नावावर धरणांसारख्या मोठ्या प्रकल्पांचे स्तोम माजत असलेले थोपवून धरण्यासाठी, तसेच शेतीचे यांत्रिकीकरणाला विरोध करण्यासाठी १९८० च्या दशकात भू.का. चळवळीचा उदय झाला, ज्यामुळे लघू आणि मध्यम प्रकारची शेती नामशेष होत चालली होती आणि शेतीचे केंद्रीकरण होत होते.