भूप्रदेश
Appearance
राज्याच्या सीमेअंतर्गत असलेला भौगोलिक प्रदेश म्हणजेच भूप्रदेश होय. राज्याला निश्चित भूप्रदेश असणे आवश्यक आहे.ज्या प्रदेशावर राज्याला शासन करण्याचा अधिकार आहे त्यांना त्याचे अधिकार क्षेत्र म्हणतात. अधिकार क्षेत्र बाबत राज्याला निर्णय घेण्याचा कायदेशीर अधिकार असतो.
भूप्रदेशाचे तीन घटक असतात ते म्हणजे खालील प्रमाणे होय.
- राष्ट्रीय सीमा अंतर्गत असलेली प्रत्यक्ष भूमी
- किनारपट्टी लगतच्या सागरी प्रदेश हा किनारपट्टीपासून १२ नॉटीकल मैल (२२.२किमी किंवा १३.८ मैल)असतो.
- आपल्या भूप्रदेशावरील आकाशाचा भाग.(आकाशात किती उंचीपर्यंत आपला प्रदेश असेल याबाबत आंतरराष्ट्रीय कायद्यात उल्लेख नाही.)