Jump to content

भीमथडी मराठी साहित्य संमेलन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भीमथडी मराठी साहित्य संमेलन
पार्श्वभूमी ची माहिती










दौंड तालुक्यात भिमथडी मराठी साहित्य संमेलनाची मुहूर्तमेढ !

पहिले राज्यस्तरीय भिमथडी मराठी साहित्य संमेलन दौंड तालुक्यातील चौफुला येथे (ता.१७ व १८ जून २०२२) रोजी पार पडले. भीमथडी मराठी साहित्य प्रतिष्ठान व मराठी साहित्य संशोधन परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने भीमथडी मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन दरवर्षी करण्यात येते.

भिमथडी मराठी साहित्य संमेलनात संमेलन उद्घाटन समारंभ, ग्रंथदिंडी, पुरस्कार वितरण सोहळा, कथा-कथन, परिसंवाद, कवी संमेलन, पुस्तक प्रकाशन समारंभ, प्रकट मुलाखत, सांस्कृतिक कार्यक्रम, लोककला सादरीकरन असे भरगच्च कार्यक्रम साजरे होत असतात. मराठी साहित्य संमेलनाचे प्रवर्तक दशरथ यादव,भीमथडी मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष संजय सोनवणे,सचिव दिपक पवार हे या साहित्य संमेलनाचे मुख्य कार्यवाहक आहेत.दरवर्षी या भीमथडी मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन दौंड तालुक्यात केले जाते.

राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन असल्याकारणाने राज्यभरातून दोन दिवस चालत असलेल्या या संमेलनात कवि,लेखक,साहित्यिक,संशोधक आदी मान्यवर सहभागी होत असतात.पहिल्या भीमथडी मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान हा लेखक,साहित्यिक,पत्रकार,इतिहास संशोधनकार दशरथ यादव यांना मिळाला आहे.