Jump to content

भि.शि. शिंदे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(भि. शि. शिंदे या पानावरून पुनर्निर्देशित)
भि.शि. शिंदे
जन्म नाव भिका शिवा शिंदे
टोपणनाव आबा
जन्म ७ मार्च १९३३
पंढरपूर
मृत्यू पुणे
शिक्षण शिक्षण पुणे विद्यापीठातून मराठी व हिंदी विषयांत एम.ए. १९६४
राष्ट्रीयत्व भारतीय
धर्म बौद्ध
कार्यक्षेत्र महाराष्ट्र
भाषा मराठी, हिंदी
साहित्य प्रकार नाटक, कादंबरी
चळवळ दलित रंगभूमी
संघटना दलित रंगभूमी, पुणे १९७९.
प्रसिद्ध साहित्यकृती काळोखाच्या गर्भात, भिक्षुणी वासवदत्ता (नाटक)
प्रभाव दलित साहित्य
प्रभावित डॉ. आंबेडकर, ज्योतिबा फुले आणि भगवान बुद्ध
अपत्ये चार

भि.शि. शिंदे उर्फ आबा (जन्म७ मार्च, १९३३ (1933-मार्च-07), मृत्यू १० सप्टेंबर, २००९) हे एक प्रसिद्ध नाटककार, साहित्यिक व दलित रंगभूमीच्या चळवळीचे आघाडीचे कार्यकर्ते होते. पुणे येथे १९८४ साली भरलेल्या पहिल्या अखिल भारतीय दलित नाट्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते[].

भि. शि. शिंदे यांनी केलेली साहित्य निर्मिती

[संपादन]

नाट्य निर्मिती, दिग्दर्शन व लेखन या क्षेत्रातले आबांचे योगदान फार मोठे आहे. त्यांनी लिहिलेली नाटके फार गाजली. कथा, कादंबरी, नाटक अशा विविध साहित्य प्रकारांत त्यांनी साहित्य निर्मिती केली. शोषित, दलित समूहाच्या वेदना आणि त्यांचे लढे आबांनी आपल्या साहित्यातून मांडले.

नाटके

[संपादन]
  1. भिक्षुणी वासवदत्ता
  2. काळोखाच्या गर्भातील दिवस
  3. आयोग
  4. पालवी
  5. मिलिंद पन्हा
  6. उद्ध्वस्त
  7. जनतेशी थेट माझी भेट घडवा (लोकनाट्य)
  8. खांद्यावरचं आभाळ
  9. अशोक विजय (नृत्यनाट्य).

नभोनाट्ये

[संपादन]

बलिदान, कथा ही उग्रा शबरीची, भूमिपुत्र, सूर्यफूल, फिनिक्स पक्ष्याचे अंडे, परिघाबाहेरील बिंदू (पुणे आकाशवाणीवरून प्रसारित), आपली माणसं' आणि 'चालू जमाना' या पुणे आकाशवाणीसाठी चालू घडामोडींवर आधारित धारावाहिक मालिकांसाठी संवाद लेखन (१९७४ ते १९८४).


दूरदर्शन

[संपादन]
  1. मुंबई दूरदर्शनसाठी आजचे पाहुणे' या सदरासाठी मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या.
  2. 'भूमिपुत्र' या स्वलिखित नाटकाची क्रांती थिएटर्स पुणे द्वारा निर्मिती करून त्याचे प्रसारण केले.
  3. 'सोंगाड्या बाज्या' या मालिकेचे लेखन करून त्रिशील फिल्मस या संस्थेद्वारा निर्मिती व प्रसारण (१९९७-९८).

कादंबरी

[संपादन]

अमृतनाक (ऐतिहासिक) (मयूर प्रकाशन १९८०); उद्ध्वस्त (भलरी प्रकाशन १९८९) आणि नवी पारध,

संशोधनपर ग्रंथ

[संपादन]

मराठी तमाशातील सोंगाड्या, अमेरिकन कृष्णवर्णीय रंगभूमी आणि दलित रंगभूमी, संत चोखामेळा आणि मी.

संस्थात्मक व इतर कार्य

[संपादन]
  1. नाट्य प्रबोध, पुणे संस्थेच्या संस्थापनेत सहभाग.
  2. दलित रंगभूमीच्या संस्थापकांपैकी एक. पहिल्या संमेलनाचे अध्यक्ष व प्रमुख विश्वस्त (१९७९). पहिले अ.भा. दलित नाट्य संमेलन, पुणे (१९८४) संमेलनाध्यक्ष.
  3. मासिक जनबोध, पुणे प्रमुख संपादक.
  4. गोव्यातील संगीत नाटक अकॅडमी दिल्ली द्वारा आयोजित पश्चिम विध(?)
  5. जनबोध (पुणे) या मासिकाचे संपादन केले.

प्राप्त पुरस्कार व सन्मान

[संपादन]
  1. उत्कृष्ट नभोनाट्य पुरस्कार भूमिपुत्र' (१९७७)
  2. उत्कृष्ट दिग्दर्शक राज्य नाट्य स्पर्धा १९८४, पुणे केंद्र. ‘पालवी' या नाटकाकरिता.
  3. पुणे मराठीग्रंथालय, हरी गणेश फडके पुरस्कार पालवी नाटकाच्या दिग्दर्शनाकरिता (१९८४).
  4. प्रबुद्ध रंगभूमी, सोलापूर द्वारा मानपत्र देऊन गौरव (१९९५).
  5. सखुबाई आगळे 'मूकनायक' पुरस्कार, डॉ. श्रीराम लागू यांच्या शुभहस्ते गौरव (१९९७).
  6. बंधुता प्रतिष्ठान, पुणे द्वारा 'जाणीव' पुरस्कार, डॉ. रा.ग. जाधव यांच्या शुभहस्ते गौरव (१९९९).
  7. नाट्य चित्रकला अकॅडमि पुणे द्वारा ‘नाट्यवैभव' पुरस्कार, मा. राम गबाले यांच्या हस्ते (२०००).
  8. अशोक सांस्कृतिक सेवा पुरस्कार अशोक सर्वांगीण विकास सोसायटी, पुणे (२००२).
  9. कला गौरव प्रतिष्ठान, पुणे द्वारा नाट्यगौरव' विशेष पुरस्कार अभिनेते दिलीपकुमार यांच्या हस्ते गौरव (२००३).
  10. 'साहित्यिक पुरस्कार' (२००३ - २००४) पंढरपूर मध्यवर्ती जयंती महोत्सव समिती, हस्ते खासदार रामदास आठवले (आर.पी.आय.)
  11. साहित्य रत्न पुरस्कार' विश्वकर्मा प्रतिष्ठान, पुणे हस्ते न्यायमूर्ती मा. बी.जे. कोळसे पाटील (२००४).
  12. ८६ वे अ.भा. मराठी नाट्य संमेलन, नांदेड (२००६), दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ डिफेन्स अकाउन्ट्‌स डिपार्टमेंट-एम्प्लॉईज, पुणे, डी.ए.डी. कन्झ्युमर्स को.ऑप.सोसायटी, पुणे, नाट्य चित्रकला अकॅडमी, पुणे, भीमज्योती विचार मंच, पुणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागरी सहकारी पतसंस्था, हिंद मजदूर सभा व अंधश्रद्धा निर्मूलन समिती, पुणे यांच्यावतीने सन्मान व गौरव पत्रे देऊन सत्कार.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Śinde, Bhi. Śi. (Bhikā Śivā), 1933- (2007). Kāḷokhācyā garbhātīla divasa (Prathamāvr̥ttī ed.). Puṇe: Snehavardhana Prakāśana. ISBN 8189634399. OCLC 271107661.CS1 maint: multiple names: authors list (link)