भारत काळे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Imbox content.png
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.


Imbox content.png
हा विभाग/लेख सामान्य उल्लेखनीयता मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुरूप नाही. कृपया या विषयाबद्दल विश्वसनीय स्रोत जोडून या लेखाची उल्लेखनीयता सिद्ध करण्यात मदत करा. जर याची उल्लेखनीयता सिद्ध केली जाऊ शकत नसेल, तर हा लेख दुसऱ्या लेखात एकत्रीत / पुनर्निर्देशित केला जाऊ शकतो किंवा थेट काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी.

भारत केशवराव काळे (जन्म : जोडपरळी-परभणी, ८ जुलै १९६८) हे आधुनिक मराठीतील कादंबरीकार, कथाकार व समीक्षक आहेत. त्यांचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला. परभणी, नांदेड येथे शिकून ते एम.ए. बी.एड्. झाले. वसमत तालुक्यातील बाराशिव हनुमान कनिष्ठ महाविद्यालयात ते अध्यापक अहेत.

त्यांच्या लेखनाची वाङ्‌मयीन जडणघडण तुकाराम महाराज, व्यंकटेश माडगुळकर, भालचंद्र नेमाडे यांच्या साहित्यवाचनातून झाली आहे.

'ऐसे कुणबी भुपाळ' (२००१) ही त्यांची ग्रामीण पार्श्वभूमीवरची पहिली कादंबरी मानवी मनातील आदिमकाळापासून चालत आलेला स्वामित्वाचा संघर्ष मांडते. तसे हे कथानक कोणत्याही पार्श्वभूमीवर वर घडू शकते. कादंबरीत लेखकाने मानवी मनाचे वर्तनशास्त्र अधोरेखित करण्या्चा प्रयत्न लेखकाने केला आहे. माणसाच्या मनातील प्रश्न आणि त्यांच्याशी निगडित विधाने यामुळे त्यांच्या भूमिका ठरत जातात. हा विचार या कादंबरीतून मांडलेला आहे.

कादंबरीत जुन्या मनोधारणांची पडझड आणि नव्या बदलात होणारी तडफड यांचे अत्यंत अप्रतिम जिव्हाळ्याने केलेले चित्रण आहे. वरवर ऐपतदार आणि जमीनदार व म्हणूनच तालेवार वाटणाऱ्या शेतकऱ्याच्या जगण्यातल्या वेदना मांडतेवेळी खानदानी मराठी कुटुंबातील स्त्रिया आणि त्यांचे परस्पर संबंध, मालक आणि गडी यांचे संबंध, गावातले राजकारण आणि निवडणुका, चढाओढी, तडातडी, भावाभावातील वैर, मान-मरातबाच्या गोष्टी, म्हातारपणी शेतकऱ्याचे थकलेल्या म्हाताऱ्या बैलासारखे निकामी म्हणून दुर्लक्षित होणे अशा अनेक गोष्टी या कादंबरीमधून येतात.

भारत काळे यांच्या 'दीक्षा' : (२००७) या कथासंग्रहातील कथा अनेक वेगवेगळे विषय घेऊन येतात. स्त्रियांची होणारी ससेहोलपट, नातेसंबंधांची गुंतागुंत, बदललेल्या गावाचे चित्रण, राजकीय लोकांचे कलाकेंद्रावरील वर्तन, महानुभाव संप्रदायातील लोकांचे जगणे वगैरे या कथांमधून मांडले आहे. या कथा बदलते खेडे व जीवन व्यवहार यांची मांडणी करतात.

भारत काळे हे काळाचा वेध घेऊन लेखन करणारे कादंबरीकार आहेत. त्यांनी केलेली मानसशास्त्रीय अंगाची मांडणी ही त्यांच्यातल्या वेगळेपणाची ओळख करून देणारी आहे. त्यांनी मानवी मनाचे अनेक धागे वाचकांच्या‍ समोर आपल्या साहित्यातून मांडले आहेत.

संदर्भ[संपादन]

ऐसे कुणबी भुपाळ (लेखक - भारत काळे)