भारती निरगुडकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डाॅ. भारती निरगुडकर (माहेरच्या आचार्य) या मुंबई विद्यापीठात मराठीच्या प्राध्यापिका असून एक मराठी लेखक आहेत. त्यांचे वडील प्रा. मा.ना. आचार्य हे अलीबागच्या जे.एस.एम काॅलेजात मराठीचे प्राध्यापक होते. भारती निगुडकरांनी गंगाधर गाडगीळांची समीक्षा आणि समीक्षाविचार' या विषयावर पीएच.डी. केली आहे.

पुस्तके[संपादन]

  • गाडगीळांची समीक्षारूपे (निरगुडकरांच्या पीएच.डी प्रबंधाचे ग्रंथरूप)
  • तपोनिधी : डाॅ. अ.का. प्रियोळकर पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ संशोधक (२४ संशोधकांची माहिती)
  • तिच्या जगण्याच्या वेणा : ४८ दलित कवयित्रीच्या कवितांचा संग्रह (संपादित, अन्य संपादक - डाॅ. मंगला सिन्नरकर, डाॅ. वसंत शेकडे आणि डाॅ. धनाजी गुरव)