Jump to content

भारतीय संविधानाची उद्देशिका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भारतीय संविधान उद्देशिका
preamble, part of a work
ह्याचा भागभारताचे संविधान संपादन
Has version, edition or translationQ134487136 संपादन
लेखकभारताची संविधान सभा संपादन
वापरलेली भाषाइंग्लिश भाषा संपादन
भारतीय संविधानाची उद्देशिका
भारतीय संविधानाची मराठीतील उद्देशिका, १९७७ नंतरची.

भारतीय प्रजासत्ताकाच्या संविधानाची उद्देशिका ही उद्देश ठरावावर आधारित आहे; जो ठराव जवाहरलाल नेहरू यांनी १३ डिसेंबर १९४६ रोजी संविधान सभेत मांडला होता आणि २२ जानेवारी १९४७ रोजी तो स्वीकारण्यात आला. संविधान सभेने २६ नोव्हेंबर १९४९ रोजी ही उद्देशिका स्वीकारली आणि ती २६ जानेवारी १९५० रोजी अंमलात आली; हा दिवस भारतात 'प्रजासत्ताक दिन' म्हणून साजरा केला जातो. याचे मूळ मसुदा लेखन जवाहरलाल नेहरू यांनी केले होते.[१] पुढे, भारतात आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात यात "समाजवादी", "धर्मनिरपेक्ष" आणि "एकात्मता" हे शब्द जोडण्यात आले.[२]

मजकूर

[संपादन]
उद्देशिका
आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा
व त्याच्या सर्व नागरिकांस:
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ति, विश्वास, श्रद्धा
व उपासना यांचे स्वातंत्र्य ;
दर्जाची व संधीची समानता;‍
निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा
आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता व एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक २६ नोव्हेंबर, १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.

हेही पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ↑ Leone, F. (2019). Prophet and Statesmen in Crafting Democracy in India: Political Leadership, Ideas, and Compromises. Lexington Books. p. 224. ISBN 978-1-4985-6937-8.
  2. ↑ "The Constitution (Forty-Second Amendment) Act, 1976". Government of India. 1 December 2010 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]

[मृत दुवा]