भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघ किंवा नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (NSUI) ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC किंवा काँग्रेस)ची विद्यार्थी शाखा आहे, जी ९ एप्रिल १९७१ रोजी स्थापन करण्यात आली. केरळ विद्यार्थी संघ आणि पश्चिम बंगाल राज्य छात्र परिषद यांचे विलीनीकरण करून या संघटनेची स्थापना इंदिरा गांधी यांनी केली होती.