भारतीय पंचवार्षिक योजना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकाच्या काळात ही योजना सुरू झाली. योजनेची उद्दिष्टे आर्थिक विकास 8 टक्के महत्वाकांक्षी दराने साध्य करणे. दारिद्र्यरेषेखालील लोकांचे प्रमाण 5 टक्के ने कमी करून ते 21 टक्के वर आणणे आणि 2012 पर्यंत 10 टक्के वर आणणे. 2007 पर्यंत प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण कऱणे. साक्षरतेचे प्रमाण 75 टक्के पर्यंत नेणे. नवजात अर्भकाच्या मृत्यूचे प्रमाण 2007 पर्यंत प्रतिहजार 45 तर 2012 पर्यंत 28 पर्यंत कमी करणे. त्याचबरोबर माता मृत्यूचे प्रमाण 2007 पर्यंत दोन आणि नोंदणीकृत नद्यांचे शुद्धीकरण करणे. 2007 पर्यंत जंगलाखालील जमिनीचे क्षेत्र 25 टक्के पर्यंत आणि 2002 पर्यंत इतर नोंदणीकृत नद्यांचे शुद्धीकरण करणे. सर्व प्रमुख मोठ्या प्रदूषित नद्यांचे आणि 2012 पर्यंत इतर नोंदणीकृत नद्यांचे शुद्धीकरण करणे. 2001-2011 या दशकांसाठीचा जननदक 16.2 टक्के इतका कमी करणे. दहाव्या योजनेत 7.6 टक्के इतका सरासरी विकासदर राखण्यामध्ये यश प्राप्त झाले. शेती क्षेत्राचे 4 टक्के इतका विकासदर निर्धारित केले असता फक्त 1.7 टक्के इतकाच विकासदर साध्य कऱण्यात आला. नियोजन आयोगाने दारिद्रयरेषेखालील लोकांचे प्रमाण 2006-07 मध्ये 19.2 टक्के दर निर्धारित केले होते. परंतु राष्ट्रीय नमुना पाहणीच्या 61 व्या फेरीतील आकडेवारीनुसार दारिद्रनिर्मूलनात फारशे यश प्राप्त करता नाही आले. 2006-07 मध्ये भारतात 29.1 अब्ज डॉलर इतकी परकीय गुंतवणुक करण्यात आली, त्यापैकी 22.1 अब्ज डॉलरची गुंतवणुक थेट विदेशी गुंतवणुकीच्या स्वरूपात होती, तर उर्वरित गुंतवणुक थेट रोख बाजारात कऱण्यात आली.