भारतीय कोल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भारतीय कोल्हा

प्रजातींची उपलब्धता
शास्त्रीय वर्गीकरण
वंश: कणाधारी
जात: सस्तन
वर्ग: मांसभक्षक
कुळ: श्वानाद्य कुळ
जातकुळी: Canis
जीव: C. aureus
शास्त्रीय नाव
C. a. indicus
आढळप्रदेश
आढळप्रदेश
Canis aureus indicus

भारतीय कोल्हा ( शास्त्रीय नावः Canis aureus indicus (कॅनिस ऑरिअस इंडिकस); इंग्रजी: Indian Jackal ( इंडियन जॅकल );) हा भारतीय उपखंडातील पाकिस्तान, भारत, नेपाळ व बांग्लादेश या देशात आढळणारा मांसाहारी वर्गातील सस्तन प्राणी आहे. तो भारतात हिमालयाच्या पायथ्यापासून कन्याकुमारीपर्यंत सर्वत्र आढळतो.

भारतीय कोल्ह्याची उंची ३८–४३ सेंमी.; डोक्यासकट शरीराची लांबी ६०–७५ सेंमी.; शेपूट २०–२७ सेंमी.; वजन ८–११ किग्रॅ. असते. उत्तर भारतातील कोल्हे सर्वसाधारणपणे मोठे असतात.

कोल्ह्याचे लांडग्याशी बरेच साधर्म्य असले, तरी लांडगा जास्त उमदा दिसतो. कोल्ह्याचा रंग भुरकट तपकिरी काळसर असतो. रंग भोवतालच्या भौगोलिक व हवामानाच्या परिस्थितीप्रमाणे बदलतो. खांदे व कान यांच्याजवळील आणि पायांचा रंग काळा, पांढरा व पुसट पिवळसर यांचे मिश्रण असतो. हिमालयातील कोल्ह्यांचा रंग जास्त पिवळसर पण कानांवर व पायांवर पिवळा रंग जास्त गडद आणि काळपट असतो.[२]

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. ^ Johnsingh, A.J.T. & Jhala, Y.V. (2008). Canis aureus. इ.स. २००६ असुरक्षित प्रजातींची आय.यू.सी.एन. "लाल" यादी. आय.यू.सी.एन. इ.स. २००६. 2006-05-11ला बघितले. Database entry includes justification for why this species is of Least Concern.
  2. ^ दातार, म. चिं. "कोल्हा". मराठी विश्वकोश. खंड ४. मुंबई: महाराष्ट्र राज्य मराठी भाषा निर्मिती मंडळ. ७५६३.