भवभूती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भवभूती हे सुमारे ८व्या शतकात होऊन गेलेले एक संस्कृत नाटककार होते.त्यांनी उत्तररामचरित, महावीरचरित आणि मालतीमाधव या रूपकांची रचना केली. दक्षिणपथातील पद्मपूर या ठिकाणी ते रहात असत.त्यांच्या वडिलांचे नाव नीलकंठ व आईचे नाव जातूकर्णी होते. संस्कृत साहित्यातील करुण रसात्मक उत्तररामचरित्र या कलाकृतीतील प्रतिभा आविष्कारामुळे 'उत्तररामचरिते भवभूतिर्विशिष्यते।' ही उक्ति अन्वर्थक ठरते.