Jump to content

ब्रायन स्ट्रँग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ब्रायन स्ट्रॅंग या पानावरून पुनर्निर्देशित)

ब्रायन कॉलिन स्ट्रँग (९ जून, १९७२:बुलावायो, ऱ्होडेशिया - ) हा झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे कडून २६ कसोटी आणि ४२ एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा डाव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी आणि उजव्या हाताने फलंदाजी करीत असे.

झिम्बाब्वेमध्ये वांशिक हिंसाचार सुरू झाल्यावर तो दक्षिण आफ्रिकेला स्थलांतरित झाला व त्याने झिम्बाब्वे क्रिकेटवर सडकून टीका केली. याचा वचपा म्हणून झिम्बाब्वेने त्याच्यावर क्रिकेट खेळण्यास बंदी घातली.

ब्रायनचा भाऊ पॉल स्ट्रँग सुद्धा झिम्बाब्वेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला.