Jump to content

बोहाडा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

'बोहाडा' हा शिमगा उत्सवासारखा आदिवासी संस्कृतीचा एक भाग असतो.बोहाडा उत्सव पालघर जिल्ह्यातील जव्हार, तलासरी, मोखाडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. बोहाडा उत्सवाला अडीचशे वर्षाहून मोठी परंपरा आहे.ह्या उत्सवात आदिवासी बांधव कलाकार आपल्या डोक्यावर विविध देवदेवतांचे मुखवटे घालतात आणि अन्य कलाकार वाजंत्री आणि संबळ वाजवतात. त्या तालावर मुखवटे घातलेले कलाकार नाचतात. त्यांना अन्य आदिवासी बांधव नाचण्यासाठी मदतही करतात.हे मुखवटे आदिवासी कलाकार उंबर, साग ह्या लाकडापासून स्वतः तयार करतात. वारली कलेप्रमाणे हस्तकौशल्य वापरून लाकडात कोरीव काम केले जाते. हे मुखवटे आदिवासींच्या परंपरागत देवता तसेच रामायण, महाभारत ह्यातील देवता ह्यांचे बनविले जातात.[]

  1. ^ महाराष्ट्र टाईम्स, मुंबई टाईम्स, वसई विरार पुरवणी, शुक्रवार दिनांक १० मार्च २०२३