बोनेलीचा गरुड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
मोरघी
घार

मोरघी किंवा बगळ्या मोरगा (इंग्लिश: bonelli's Eagle; हिंदी:मोरंगी; गुजराती:सांसागर; संस्कृत:मयूरघ्नी, सिंहल श्नेयक; तेलुगू: कुदेली सलव) हा एक शिकारी पक्षी आहे.

ओळख[संपादन]

हा आकाराने घारीपेक्षा मोठा,किरकोळ आणि तुरा नसलेला असतो. याच्यावरील अंगाचा रंग गर्द धुरकट व पिंगट.खालील भाग पांढरा-तांबूस.त्यावर काळसर काड्या.शेपटीचा वरील रंग गर्द राखाडी. खालील भागावर काळे पट्टे. नर-मादी दिसायला सारखे असले,तरी मादी आकाराने मोठी असते.

हा पक्षी पूर्व बंगाल वगळता भारतात सर्व ठिकाणी आढळून येतो.

या पक्ष्याची डिसेंबर ते जानेवारी या काळात भारतात वीण होते.

संदर्भ[संपादन]

  • पक्षिकोश - मारुती चितमपल्ली