Jump to content

बै शीचांग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हे चिनी नाव असून, आडनाव बै असे आहे.

बै शीचांग (सोपी चिनी लिपी: 贝时璋 ; पारंपरिक चिनी लिपी: 貝時璋 ; पिन्यिन: Bèi Shízhāng ;) (ऑक्टोबर १०, १९०३ - ऑक्टोबर २९, २००९) हा चीनच्या जनता प्रजासत्ताकातील जीवशास्त्रज्ञ व प्राध्यापक होता. तो चिनी विज्ञान अकादमीचा सदस्य होता.

त्याने ट्युबिंगन विद्यापीठातून १९२८ साली डॉक्टरेट मिळवली. चीनच्या जनता प्रजासत्ताकातील पेशीय जीवशास्त्राच्या क्षेत्रात त्याने महत्त्वाची कामगिरी बजावली.