बुलढाणा-रोहिणखेड प्राचीन मशीद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

बुलडाणा शहरापासून २० कि.मी., (मोताळा तालुक्यापासून १२ कि.मी.) अंतरावरील रोहिणखेड हे प्रसिद्ध तथा पुरातन वस्ती असणारे गाव आहे. येथे स्थापत्य कलेचा विलोभनीय उदाहरण असलेली मशीद आहे. एकेकाळी निजामशाहीत राजधानीचे शहर म्हणून रोहिणखेड गावाला रोहिणाबाद अशी ओळख होती. या ठिकाणी सन १८८२ मध्ये खुदावतखॉं महमद यांनी बांधलेली पुरातन भव्य मशीद आहे. या मशीदीच्या भिंतीवर कुराणाच्या आयत आरेबिक भाषेत लिहिल्या आहेत. या भिंतीवरील आयतांवरून ओले कापड फिरविल्यास लाल अक्षरातील अक्षरे दिसतात व ओलावा नाहीसा झाला की अक्षरे लुप्त होतात. आजही दर शुक्रवारी विशेष नमाज पठन या ठिकाणी केल्या जाते. या मशीदीचे बांधकाम संपूर्ण दगडामध्ये झाले असून, कला कृतीचा उत्तम नमुना ही मशीद प्रसिद्ध आहे. त्यामुळे या मशीदीला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालेले आहे.

रोहिणखेड गावात या मशीदीसह अनेक ठिकाणी पुरातन वास्तुंचा ठेवा आहे. येथे दोन मोठय़ा लढाया झाल्याचा इतिहास आहे. सन १४३७ च्या सुमारास खान्देशचा सुलतान नजिरखानने त्याचा जावई अल्लाउद्दीन बहामनीवर स्वारी केली. सन १५९० च्या सुमारास अहमदनगरच्या राजकुमार बुरहानने खान्देशचा राजा अलिखानच्या बरोबर जमालखानवर याच ठिकाणी युद्ध केल्याची नोंद आहे. निजामशाहीतील रोहिणाबाद हे राजधानीचे शहर व्यापारासाठी प्रसिद्ध असल्याने सुखी व समृद्ध होते.[१]

  1. ^ kasar, sadik. [www.facebook.com "बुलडाणा - प्राचीन मशिद, रोहिणखेड"] Check |दुवा= value (सहाय्य). buldana katta group fb.