बुर्बाकी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

निकोला बुर्बाकी (फ्रेंच: रोमन लिपी: Nicola Bourbaki ;) हे १९३०-३४ दरम्यान काही महान फ्रेंच गणित्यानीं सुरु केलेल्या गणित ग्रंथ मालिकेच्या काल्पनिक लेखकाचे नाव आहे. अजुनही गणिताच्या समाजामधे या संघटनेला "निकोला बुर्बाकी" अशा एकेरी नावानेच संबोधतात.

उगम नि इतिहास[संपादन]

१ल्या महायुद्धानंतर प्यारीसाच्या ईकोल इन्स्टिट्युट मधील वाइल, दिओदुने प्रभृती गणित्यांनी एकत्र येउन निकोला बुर्बकी (Nicolaस् Bourbaki) या टोपण नावाने गुप्तपणे गणितावरील पुस्तके लिहिली. याच टोपणनावाने पुढे या संघटनेमधे नवनवीन गणिती सामिल झाले नि त्यानी हे कार्य चालू ठेवले [१]. १९व्या शतकात गणितामध्ये उत्तर जर्मनीतील ग्योटीङ्गेनने एक नवी लाट आणली होती. इथे गाउस नंतर आलेल्या हिल्बर्ट-न्व्यायादार-लाण्डाऊ यांच्या पिढीने एक क्रांती घडवली होती. फ्रेंच गणित आता पूर्वीसारखे राहिले नाही हे सर्वांचेच मत होते. ही स्थिती वाईट आहे नि ती सुधारलीच पाहिजे यावर वाइल, दिओदुने यांचे एक मत होते. त्यांनी गणितात कोणते बदल हवे आहेत यावर विचार विनिमय करून स्वतःसाठी काही मार्गदर्शक तत्वे स्वीकारली. त्यांनी लिहायला घेतलेल्य लेख मालिकेचे नाव Éléments de mathématique असे ठेवले. त्यांनी ही पुस्तके फ्रेंच मधेच लिहिली. युक्लीडला आधुनिक गणिताचा प्रेरक मानून त्यांनी आपल्या लेखनमालिकेचे नाव युक्लिडच्या "Elements" या ग्रंथावरून ठेवले. प्यारीस अकादमी आणि इकोलमध्ये निकोल बुर्बाकीला अतिशय प्रसिद्ध केले गेले नि हरमन कडून आपली पुस्तके छापून घेतली गेली. पुढे विषयाचा आवाका वाढू लागल्यावर त्यांनी इतर अतिहुशार फ्रेंच गणित्यांना आपल्या या गुप्त संघामध्ये ओढायला सुरुवात केली. जॉ कुलोंब सारखे प्रतिष्ठित भौतिक शास्त्रज्ञही या टोळक्यात काही काळ सामील झाले. पुढे जाऊन या टोळीमध्ये सेर्र, ग्रोथेण्डिक सारखे महान अवलिये सामील झाले. प्रसिद्ध गणित लेखक सर्ज ल्यांग हाही काही काळ ह्या संघाटनेमधे होता. वयाच्या पन्नाशी नंतर या संघातून निवृत्त व्हायचे असा नियम होता. सर्वानीच तो पाळला. मग नवे लोक भारती करून घेतले जात. १९८० पर्यंत बुर्बाकींनी भरीव कामगिरी केली. त्यानी केलेल्या लिखाणाची यादी अशी:

त्यानी गणितीय गोधड्यांवरील (Theory of Manifolds) सिद्धांतांचा संग्रहही प्रसिद्ध केला. आत्ता २०१२ साली "अल्जेब्रा"चा १२वा धडा त्यांनी लिहिला.

गणितीय ध्येय[संपादन]

त्याच्या Éléments de mathématique लिहिण्यामागे बरेच हेतू होते. त्या काळापर्यंत गणिताचे लोक भौतिकशास्त्राला मदत म्हणून गणित करत. जे असे करत नसत ते त्यांच्या गणितातील बरीच उदाहरणे, संज्ञा भौतिक शास्त्रातून प्रेरित झालेल्या होत्या. कित्येकदा ते व्याख्याही भौतिक शास्त्राच्याच भाषेत मांडत. हे सर्व प्रकार बंद करून गणिताला एक स्वतंत्र शास्त्र म्हणून त्याला उदयास आणायचे होते. गणिताची सर्व चिह्ने, संकल्पना नि संज्ञा यांची निव्वळ गणिती प्रेरणेने पुनर्रचना त्याला करावयाची होती. हिल्बर्टच्या सैद्धांतिक पद्धतीला = Axiomatic method, पुढे न्यायचे होते. हे सर्व होण्यासाठी त्याकाळातील सर्वच गणित नवीन भाषेमध्ये पुन्हा एकदा लिहून काढणे गरजेचे होते. गणिताभ्यासासाठी उत्तम असा पुस्तक संच त्याला बनवायचा होता की, जो गणिताचा सर्वोत्तम संदर्भ म्हणून वापरला जाऊ शकेन.

बुर्बाकीबाबतच्या गप्पा[संपादन]

सुरुवातीच्या काळात हे लोक कधी प्यारीस इकोलमध्ये चर्चेसाठी भेटत तर कधी प्यारीस इन्स्टिट्युटमध्ये. मनात आल्यास ते शेजारच्या गावांत नि शेतामध्ये भेटत. आपल्या कल्पना नि गणिताचे चिटोरे घेऊन हे चर्चा करत. संघटनेच्या नियमांप्रमाणे त्यांच्यामध्ये प्रमुख कोण असे ठरवले जाणार नव्हते. सर्वच जण समान. तरीही वाइल सुरुवातील मार्गादर्शकासारखा होता. नंतरच्या काळात दिओदुने सर्वाधिक प्रभावी ठरला. ही चर्चा क्वचितच 'चर्चा' असे. सारे जण आपापली मते जोरदार मांडली जात. कोणाचा दृष्टीकोन जास्त योग्य, कोणता विषय जास्त महत्वाचा यावर हमरीतुमरी होई. आपले कागद वाचायला दिला तर समोरचा तो थेट बोळा करून भिरकावून देई! दुओदुनेला तर काहीच मान्य नसे! या बुर्बाकींपैकी (आता ह्या संघातील लोकांना Bourbakis म्हणतात) काही जणांच्या बायकांनी ह्या चर्चा पाहिल्या आहेत आणि त्या म्हणतात कि कित्येकदा असे वाटे की हे एकमेकांची टाळकी फोडणार किंवा दुओदेने टेबल उचलून फेकणार! पण घनघोर तात्विक चकमक या पुढे कधीच हे वाद गेले नाहीत. या चकमकी पाहणारे म्हणतात की इतके सारे होऊन त्यातून इतकी चांगली पुस्तके कशी बाहेर पडली हे आश्चर्याच आहे! कागदाचे कपटे नि आरडओरडा सोडून यातून काही बाहेर पडेल असे आम्हाला वाटले नव्हते! अद्यापी कित्येक जणांना हा एक खराखुरा माणूसच वाटतो. या संघटनेबाबात बोलतानाही कोणी अनेकवचन ना वापरता "तो बुर्बाकी" असे एकवचनच वापर्तात.

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. माझा गणिताची बोलू कवतुके, रहस्यकथा एका नेपोलिअनिक(?) योद्ध्याची


बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत