बुधभूषण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बुधभूषण हा छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेला संस्कृत ग्रंथ आहे. या ग्रंथात महाराजांनी प्रशासन कसे चालवावे, काय नियम असावेत याचे विवेचन केले आहे. या ग्रंथाचे मराठीत अनेक अनुवाद झाले आहेत.[ संदर्भ हवा ] ग्रंथाचा अभ्यास करून काही जणांनी एम.फिल./पीएच.डी. मिळवली आहे.[ संदर्भ हवा ] या ग्रंथाची मूळ हस्तलिखित प्रत मुंबईच्या शासकीय ग्रंथालयात आहे.

बुधबूषण हा स्वतंत्र ग्रंथ नाही.[ संदर्भ हवा ] यातले अनेक श्लोक संग्रहित आहेत.[ संदर्भ हवा ] हा ग्रंथ लिहिण्यापूर्वी संभाजी महाराजांनी महाभारत, मनुस्मृती, कामन्दकीय नीतिसार, विष्णुधर्मोत्तर पुराण, मत्स्यपुराण आदी प्राचीन ग्रंथांचा सखोल अभ्यास केला असला पाहिजे.[ संदर्भ हवा ] विविध पुराण ग्रंथांतून संभाजी महाराजांनी ’राजनीती' या विषयाला धरून निवडलेले श्लोक त्यांचे सुयोग्य वर्गीकरण करून व विषयानुरूप शीर्षके देऊन या ग्रंथात समाविष्ट केले आहेत.[ संदर्भ हवा ]

बुधभूषणमध्ये शेषनाग, गरुड, जीभ, भ्रमर, कुंभ, मीन (मासा), उंट, दुंदुभी, निंबवृक्ष, सोने इत्यादी विषयावर एक-एक तर सूर्यासंबंधीचे ७, चंद्रासंबंधीचे ७, वायुसंबंधीचे ३, मधुकर (भ्रमर) संबंधीचे ७, हंसाविषयीचे ५, हत्तीसंबंधीचे ५, विविध वृक्षासंबंधीचे १९ असे श्लोक आहेत.[ संदर्भ हवा ] सुमारे एकोणनव्वद विषयांवर निरनिराळ्या पक्ष्यांची, वृक्षांची उदाहरणे देऊन अन्योक्ती रूपाने व्यंगाचा मोठा खुबीदार वापर या ग्रंथातल्या श्लोकांत झाला आहे.[ संदर्भ हवा ]

बुधभूषणचे मराठी अनुवाद[संपादन]

  • प्रा.रामकृष्ण आनंदराव कदम लिखित ’छत्रपती संभाजी महाराज विरचित बुधभूषण-राजनीती'
  • डॉ. प्रभाकर ताकवले यांनी केलेला अनुवाद.


संदर्भ[संपादन]