बीजपरीक्षण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बीजपरीक्षण (SEED TESTING) दर्जेदार बियाण्यात खालील गुणधर्म असतात. अनूवांशिक द्रुष्ट्या त्या त्या जातीचे गुणधर्म त्याच्या प्रजेत उतरले पाहिजेत. चांगल्या बियाण्यात उत्तम रुजवणक्षमता पाहिजे. ते रोग व कीटक यापासून मुक्त पाहिजे. ते इतर बियापसून वा तनांच्या बियाण्यापासून मुक्त पाहिजे. बियाण्याची अनूवांशिक शुद्धता व रुजवणक्षमता बीजपरीक्षणाने कळून येते. बीजपरीक्षणामुळे त्या बाबतीत अस्तित्वात असलेल्या कायद्याची पूर्तता करता येते. बियाण्याची गुणवत्ता कळते. त्यामुळे दर एकरी बियाणे किती वापरावे हे कळते. बराच काळ साठवलेले बियाणेदेखील पुनः परीक्षण (RETESTING) करवून घ्यायला हवे.