बिस्लेरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बिस्लेरी इंटरनॅशनल प्रायवेट लिमिटेड
प्रकार खाजगी
उद्योग क्षेत्र शीतपेये

बिस्लेरी इंटरनॅशनल ही एक भारतीय कंपनी आहे जी इ.स. १९८४ मध्ये जयंतीलाल चौहान यांनी स्थापन केली होती.[१] ही कंपनी बाटलीबंद पाण्याच्या ब्रँडसाठी प्रसिद्ध आहे. जे फेलिस बिस्लेरी यांनी १९६५ मध्ये सोडा ब्रँड म्हणून सादर केले होते आणि १९६९ मध्ये चौहान यांनी विकत घेतले होते.[२] ही कंपनी सध्या बाटलीबंद पाणी आणि शीतपेये विकते.

बिस्लेरी कंपनीचे १३५ ऑपरेशनल प्लांट्स आणि ३,००० वितरक आणि ५,००० डिस्ट्रिब्युशन ट्रक्सच्या नेटवर्कसह, भारतात बाटलीबंद पाण्याचा प्रमुख व्यवसाय करते.[३] बिस्लेरी स्वतःच्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आणि इतर ऑनलाइन किरकोळ विक्रेत्यांद्वारे देखील आपली उत्पादने वितरीत करते.[४]

इतिहास[संपादन]

बिस्लेरी ही मुळात फेलिस बिस्लेरी यांनी तयार केलेली एक इटालियन कंपनी होती. जिने सर्वप्रथम भारतात बाटलीबंद पाणी विकण्याची कल्पना आणली होती. बिस्लेरी नंतर इ.स. १९६५ मध्ये सिल्चर, आसाम येथे काचेच्या बाटल्यांमध्ये बबली आणि स्थिर अशा दोन प्रकारांमध्ये सादर करण्यात आली.[५]

इ.स. २०२१ मध्ये, बिस्लेरीने हँड सॅनिटायझर उत्पादनांची शृंखला सुरु केली.[६]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Bisleri International Pvt Ltd". www.bloomberg.com. 4 February 2022 रोजी पाहिले.
  2. ^ "Why Ramesh Chauhan is high on water". Business Today (इंग्रजी भाषेत). 4 February 2022 रोजी पाहिले.
  3. ^ "what makes us stand apart". www.bisleri.com. 28 March 2020 रोजी पाहिले.
  4. ^ "Bisleri@Doorstep - Bisleri Products Online Shopping by Bisleri India". shop.bisleri.com (इंग्रजी भाषेत). 2020-10-20 रोजी पाहिले.
  5. ^ "And this is how Parle Bisleri began". Rediff (इंग्रजी भाषेत). 2020-04-04 रोजी पाहिले.
  6. ^ "Bisleri eyes hygiene segment, launches hand purifiers". Moneycontrol (इंग्रजी भाषेत). 24 April 2022 रोजी पाहिले.

बाह्य दुवे[संपादन]