Jump to content

बीदरचे मकबरे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बिदरचे मकबरे या पानावरून पुनर्निर्देशित)

बिदर शहरातून बाहेर पडले की सगळीकडे दख्खनचे मोकळे पठार दिसू लागते. शहराबाहेर साधारणपणे साडेतीन मैल गेले की दूरवर भव्य मकबरे दिसू लागतात. हे १२ मकबरे आहेत. हे मकबरे आणि या वास्तू बांधायला बिदरच्या सुलतानांनी तुर्कस्तानातून आणि अरबस्तानातून निष्णात कारागीर आणले होते. हजर बंदे नवाझ, मेहमूद गवान यांसारख्या अतिशय सच्च्या आणि निःस्वार्थी धुरीणांनी ही असामान्य निर्मिती करायला मोठा हातभार लावला.

मेहमूद गवान या त्यावेळचा अतिशय मोठा विद्वान होता. त्याने समरकंदच्या आणि खोरासनच्या धर्तीवर बिदर येथे मोठे विद्यालय उभारले. बिदरमधल्या असामान्य वास्तूंच्या निर्मितीत त्याचा सिंहाचा वाटा आहे.

बिदरच्या सुलतानांनी आपल्या माणसांच्या॒ चिरविश्रांतीसाठी कल्पनेपलीकडचे भव्य आणि नजाकतदार मकबरे उभारले. हे मकबरे वस्तीपासून दूर आहेत. भोवताली तट बांधून त्यांत पण्याची व्यवस्था केली. निसर्ग, मोकळेपणा आणि शांतता या सगळ्यांचा कसोशीने विचार करून हे मकबरे बांधले गेले. अशा काही मकबऱ्यांची ही माहिती :-

हजरत खलील उल्लाह दर्गा

[संपादन]

बिदर शहराबाहेरचा आऊटर रिंग रोड ओलांडला की डावीकडे एका छोट्याश्या टेकडीवजा उंचवट्यावर असलेली ही वास्तू चौखंडी या नावाने प्रसिद्ध आहे. हा सुंदर दर्गा माळरानावरील झाडीत वसलेला आहे. एक प्राचीन भव्य अष्टकोनी इमारत, आणि जीर्ण बांधकाम हे या दर्ग्याचे वर्णन. आजूबाजूला सगळा मोकळा आणि शांत निसर्ग, दूरवर पसरलेला हिरवागार माळ.वा आणि वर आकाश. दर्ग्याच्या आतल्या छताची उंची ६० ते ७० फूट आहे. दर्ग्यावर एक घुमट आहे आणि आत एक पीर (कबर). दर्ग्यामध्ये नैसर्गिक प्रकाश झिरपण्याची आणि खेळती हवा वाहण्याची अतिशय सुंदर सोय केलेली आहे. मुख्य द्वाराच्या भोवती आणि आजूबाजूला कधीकाळी रंगीबेरंगी रत्नांचे सुंदर नक्षीकाम असावे.

दर्ग्यातील पीराची (मजारची) रोज पूजा केली जाते. एक दिवा तेथे अखंड तेवत असतो. सर्वच धर्माचे लोक येथे प्रार्थना करायला आणि दुवा मागायला येतात.

अहमद शाह वलीचा मकबरा

[संपादन]

चौखंडी दर्ग्यापासून काही अंतरावरच १२ बहामनी दर्गे आहेत. त्या ठिकाणाला ’अष्टुर’ म्हणतात. यांतील प्रत्येक वास्तू स्थापत्यशास्त्राची महती सांगणारी आहे. हे सगळे मकबरे राजघराण्यातील व्यक्तींसाठी उभारण्यात आले आहेत. त्यांतला एक अहमद शाह वली या सुलतानाचा आहे. हा सुलतान ख्वाज बंदे नवाझ या सुफी फकिराचा निःसीम भक्त होता. त्या फकिरानेच या सुलतानाला वली हा किताब दिला. या मकबऱ्याच्या आतल्या भिंतींवर अप्रतिम कलाकुसर आणि चित्रे आहेतच, शिवाय कुराणातली भक्तिवचनेही सोने वापरून लिहिलेली आहेत. या मकबऱ्यातील मुख्य कबरीसमोरचा दिवा अखंड तेवत असतो.

सुलतान अल्लाउद्दीन शाह (दुसरा) याचा मकबरा

[संपादन]

या मकबऱ्यातही स्थापत्यशास्त्राची कमाल पहायला मिळते.

सुलतान हुमायूंचा मकबरा

[संपादन]

या सुलतान हुमायूंने तीन वर्षे राज्य केले. मात्र तो अतिशय क्रूर शासक होता. त्याच्या कारकिर्दीत त्याने लोकांना अतोनात त्रास दिला. असे म्हणतात की त्यामुळेच त्याच्या मकबऱ्यावर वीज पडून मकबऱ्याची भग्नावस्था झाली. आजही हा मकबरा पडक्या अवस्थेत आहे. या मकबऱ्याला कोणीही भेट देत नाही; याउलट अहमद शाह वलीच्या मकबऱ्याच्या वार्षिक उरुसाला पंचक्रोशीतील हिंदू आणि मुसलमान मोठ्या संख्येने हजर असतात.


(अपूर्ण)