बिकिनी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
समुद्रकिनाऱ्यावर बिकिनी परिधान केलेली एक महिला

बिकिनी हा सामान्यत: महिलांसाठीचा दोन भागांचा असलेला स्विम सूट असतो. शरीराच्या वरच्या भागासाठी असलेल्ला भागात फॅब्रिकचे दोन त्रिकोण ब्रेसियर सारखेच असतात जे स्त्रीचे स्तन झाकून घेतात. आणि शरिराच्या खालच्या भागातही फॅब्रिकचे दोन त्रिकोण असतात, एक पुढच्या भागाला, ओटीपोटाला, झाकण्यासाठी परंतु नाभी (बेंबी) उघडीच असते, आणि मागच्या भागासाठी, नितंब, झाकण्यासाठी. [१] [२] यातील त्रिकोणांचा आकार भिन्न भिन्न असू शकतो. तसेच ते त्रिकोण स्तन, योनी आणि नितंब पूर्णपणे झाकण्यापासून ते अंशतः झाकण्यापर्यंत वेगवेगळ्य्या आकाराचे असू शकतात.

मे १९४६ मध्ये पॅरिसच्या फॅशन डिझायनर जॅक्स हेम याने दोन तुकड्यांच्या स्विमसूट डिझाईनचे प्रकाशन केले. त्याचे नाव त्याने अ‍ॅटॉम ठेवले होते. [३] त्या काळातील इतर स्विम सूटप्रमाणेच या अ‍ॅटॉम डिझाईनमध्येही महिलेची नाभी (बेंबी) झाकली गेल्यामुळे फारसे विषेश लक्ष वेधण्यात हे डिझाईन अयशस्वी ठरले होते. कपड्यांचे डिझायनर लुईस रार्ड यांनी जुलै १९४६ मध्ये नवीन आणि छोटी रचना सादर केली. [४] त्याने या स्विमिंग सूटचे नाव बिकिनी एटॉल असे ठेवले. चार दिवस आधी झालेल्या सार्वजनिक अणुबॉम्ब चाचणीला अनुसरून हे नाव ठेवण्यात आले होते. या नवीन डिझाइन जास्त अश्लील होता, यात पोषाख घालणारीची नाभी आणि बऱ्यापैकी नितंब दिसत होते. त्यावेळेसचे नावाजलेली कोणतीही मॉडेलने ते डिझाइन घातले नसते म्हणून त्याने या स्विमसूटच्या मॉडेलसाठी त्यावेळेसची न्यूड डान्सर, मायकेलिन बर्नार्डिनी,चा वापर केला. ती कॅसिनो डे पॅरिस मध्ये काम करत होती. [५]

त्याच्या या विवादास्पद प्रसिद्धीमुळे आणि दिखाव्याच्या डिझाइनमुळे, बिकिनी लोकांनी फारच हळू हळू स्वीकारली. बिकिनीला अधिक मान्यता तेव्हा मिळाले जेव्हा ब्रिजिट बार्दोट, रॅकेल वेलच आणि उर्सुला अ‍ॅन्ड्रेस या फिल्म स्टारनी ते परिधान करून सार्वजनिक समुद्रकिनाऱ्यावर फोटो काढले आणि चित्रपटातही काही सीन्स दिले. १९६० च्या दशकाच्या मध्यापर्यंत बहुतेक पाश्चात्य देशांमध्ये अधिक छोट्या आकाराच्या बिकिनी या स्विमवेअर आणि अंतरवस्त्र म्हणून वापरात आल्या. २० व्या शतकाच्या उत्तरार्धात बीच व्हॉलीबॉल आणि बॉडीबिल्डिंगसाठी या स्पोर्ट्सवेअर (अ‍ॅक्टिववेअर) म्हणून मोठ्या प्रमाणात वापरल्या जाऊ लागल्या. बिकिनीच्या इतर बऱ्याच रचना विविधा उद्योगात वापरण्यात येतात. त्यांना उपयोगानुसार आणि आकारानुसार विविधा नावे देण्यात आली उदा मोनोकिनी, मायक्रोकिनी, टॅंकिनी, ट्राकिनी, पबिकिनी आणि स्कर्टिनी. पुरुषांच्या एकाच तुकड्याच्या स्विमसूटला देखील बिकिनी म्हणतात. [२]

पाश्चात्य समाजामध्ये हळूहळू बिकिनीला मान्यता प्राप्त झाली. २००० च्या दशकाच्या सुरुवातीला, बिकिनीची उलाढाल दरसाल ११ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची झाली. तसेच बिकिनी वॅक्सिंग आणि सन टॅनिंग सारख्य सेवांनाही चालना मिळाली. [६]

व्युत्पत्तिशास्त्र आणि शब्दावली[संपादन]

टू-पीस स्विमिंग सूट याचा उल्लेख युरोपच्या इतिहासात (६ वे शतक) आढळतो. [७] परंतु आधुनिक जगतात याचा प्रथम उल्लेख ५ जुलै १९४६ रोजी पॅरिसमध्ये झाल्याचे आढळते. [८]

संदर्भ[संपादन]

  1. ^ Charleston, Beth Duncuff (October 2004). "The Bikini". Heilbrunn Timeline of Art History. New York: The Metropolitan Museum of Art. August 15, 2013 रोजी पाहिले.
  2. ^ a b साचा:Cite dictionary
  3. ^ Cole, Thomas G. II. "(The) Bikini: EmBodying the Bomb". Genders Journal. Archived from the original on 2011-09-01.
  4. ^ "Le Bikini souffle ses 60 bougies !". www.journaldesfemmes.com (फ्रेंच भाषेत). 17 May 2018 रोजी पाहिले.
  5. ^ "Operation Crossroads: Fact Sheet". Department of the Navy—Naval History and Heritage Command. Archived from the original on 24 October 2012. 13 August 2013 रोजी पाहिले.
  6. ^ Lorna Edwards, "You've still got it, babe, The Age, June 3, 2006
  7. ^ Agrawala, P.K. (1983). Goddesses in Ancient India (first ed.). Atlantic Highlands, N.J.: Humanities Press. p. 12. ISBN 978-0-391-02960-6.
  8. ^ Kathryn Westcott, "The Bikini: Not a brief affair", BBC News, June 5, 2006