बास्केट चाट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बास्केट चाट हा एक खाद्यपदार्थ आहे.लखनौ मध्ये हा पदार्थ विशेष प्रसिद्ध आहे.[१]

साहित्य[संपादन]

• रवा • मैदा • कॉनफ्लावर • शिजवलेले मुग • बारीक चिरलेला कांदा • चिंचेचा कोळ • दही • चाट मसाला • मीठ • तेल • बारीक चिरलेलीब कोथिंबीर • बारीक शेव

कृती[संपादन]

प्रथम एका भांड्यामध्ये मैदा , कॉर्नफ्लावर, रवा आणि चवीनुसार मीठ हे सर्व घेऊन चांगले मळून घ्यावे . त्यानंतर मळलेल्या मिश्रणाला किमान ३० मिनिटे भिजत ठेवावे . त्यानंतर तेल गरम करण्यासाठी ठेवावे . तेल गरम होईपर्यंत त्या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून घ्यावेत . त्यानंतर एक छोटी वाटी घेऊन त्या वाटीच्या खालच्या सर्व बाजूला थोडसे तेल लावावे. त्यानंतर त्या वाटीच्या खालच्या बाजूला ते मिश्रण लावावे . मिश्रणाला जरा खालच्या बाजूला छिद्रे द्यावीत . छिद्रे दिल्यामुळे त्यात तेल जाते व ते चांगले कूरकूरीत होते . त्यानंतर ती वाटी तेलात सोडून द्यावी . तेलात सोडल्या नंतर ती वाटी आपोआप बाहेर पडते व त्या मिश्राला वाटीचा आकार प्राप्त होऊन बास्केट तयार होते. ते बास्केट चांगले तळून घ्यावे . ते बास्केट थोडे गार झाल्यानंतर त्यामध्ये सर्वात खाली मुग ठेवावे त्याच्यावर दही नंतर चिंचेचा कोळ , बारीक शेव ,बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर घालावे . त्यानंतर सर्वात वर चाट मसाला घालावा. अशा पद्धतीने बास्केट चाट खाण्यासाठी तयार होईल .

बास्केट चाट बनविण्यासाठी आपण वेगवेगळ्या पालेभाज्यांचा उपयोग करू शकतो.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "What Goes Into The Making Of Lucknow's Famous Tokri (Basket) Chaat?". NDTV Food (इंग्रजी भाषेत). 2021-05-27 रोजी पाहिले.